'पुढचं पाऊल'मध्ये कोण 'चोर' कोण 'शिरजोर' - Marathi News 24taas.com

'पुढचं पाऊल'मध्ये कोण 'चोर' कोण 'शिरजोर'

www.24taas.com
 
पुढचं पाऊल या मालिकेत राजलक्ष्मी कांचनमालावर मात करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यामुळे सध्या राजलक्ष्मीने कांचनमालाला चांगलाच धडा शिकवला आहे. राजलक्ष्मीने कांचनमालाला नोकरासारखं घरात राहण्याची शिक्षा दिली आहे. मात्र या सगळ्यातून सुटका करण्यासाठी कांचनमाला सतत युक्ती आखत असतात.
 
आणि सध्या कांचनमाला घरातून गायब झाल्या आहेत. कांचनमाला घरात दिसत नसल्यामुळे त्यांची शोधाशोध सुरू होते मात्र अखेर त्या सापडतात त्या कपाटात. कपाटातून त्यांची सुटका तर होते मात्र त्या कपाटात कशासाठी गेल्या होत्या याचा उलगडाही त्या करतात. कपाटात कोंडल्यामुळे त्यांचा जीव कासावीस होतो. त्यामुळे त्या रुपालीकडे थंड पाणी मागतात. मात्र राजलक्ष्मीने त्यांच्यासाठी अगदी खासच सोय करून ठेवलेली असते.
 
या सगळ्याची कांचनमालाला आधी गंमत वाटते मात्र भानावर येताच त्या दचकतात. राजलक्ष्मीने तर आता कांचनमालाला धडा शिकवण्यासाठी विडाच उचलला आहे. त्यामुळे सध्या शेरास सव्वाशेर असंच चित्र या मालिकेत पाहायला मिळतं आहे.
 
 
 

First Published: Tuesday, April 10, 2012, 20:44


comments powered by Disqus