पुरात अडकलेला भज्जी देतोय इतरांना दिलासा!, harbhajan singh trapped in flood-affected

पुरात अडकलेला भज्जी देतोय इतरांना दिलासा!

पुरात अडकलेला भज्जी देतोय इतरांना दिलासा!
www.24taas.com, झी मीडिया, देहरादून

क्रिकेटर हरभजन सिंग सध्या पूरग्रस्त भागातील जोशीमठात अडकलाय. ‘आयटीबीपी’च्या कॅम्पनं त्याला तात्पुरता आसरा दिलाय. गेल्या तीन दिवसांपासून हरभजन इथंच अडकून पडलाय. पण, इथंही तो शांत न बसता पूरपरिस्थिती अडकलेल्या लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतोय.


‘हेमकुंड साहेब’च्या दर्शनासाठी निघालेला हरभजन सिंग पावसाच्या दणक्यानं चांगलाच फसलाय. हिमाचल प्रदेशातील देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तराखंडमध्ये निसर्गाचा प्रकोप झाल्यानंतर त्याचा फटका हरभजनलाही बसला. इथं जवळजवळ ६०० जवान बचावकार्यात गुंतले आहेत. त्यांची मदत करण्याचा आणि अडकलेल्या लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न भज्जी इथं करतोय.

पिथौरागडच्या धारचुलामध्ये आयटीबीपी, एनएचपीसी आणि बीआरओचे १६ भवन, गोरखा रेजिमेन्टचे १२ बरॅक, एक गाड्यांचा पूल, आयटीबीपीचा सेला कँप आणि पॉवर हाऊस तसंच कर्मचाऱ्यांचे क्वार्टरही पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेलेत. उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये १२ हॅलिकॉप्टर बचावकार्यात गुंतलेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 20, 2013, 08:33


comments powered by Disqus