Last Updated: Thursday, June 20, 2013, 10:45
www.24taas.com, झी मीडिया, देहरादून उत्तराखंडमधल्या जलप्रकोपानं केदारनाथला होत्याचं नव्हतं करून टाकलंय. सध्या केदारनाथ मंदिराचा गाभारा सोडून आणखी काहीही उरलेलं दिसत नाही. या पडझड झालेल्या मंदिराला पुन्हा उभारण्यासाठी दोन-तीन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे, असं इथल्या मंदिर समितीच्या अध्यक्षांचं म्हणणं आहे.
पुराचा सगळ्यात मोठा फटका केदारनाथला बसलाय. बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष गणेश घौडियाल यांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिरातील आतल्या भागाला याची झळ पोहचलेली नाही. शिवलिंग सुरक्षित आहे. पण पुराच्या पाण्यात वाहून आलेली माती-रेती मात्र मंदिरात साचलेली आहे.
मंदिराच्या आजुबाजूला काहीही वाचलेलं नाही. मंदिर समितीचं कार्यालय, धर्मशाळा तसंच भांडारगृह आणि इतर सर्वच उद्ध्वस्त झालंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, June 20, 2013, 10:43