Last Updated: Wednesday, June 19, 2013, 19:07
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीउत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी मदतकार्यात जोरात सुरू असल्याची माहिती पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलीय. आतापर्यंत १० हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय.
मात्र अजून ५२ हजार जणांच्या सुटकेचे आव्हान प्रशासनासमोर आहे. लष्कराच्या २२ हेलिकॉप्टर्सच्या मदतीनं नागरिकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कालपेक्षा आज हवामान चांगलं असल्यामुळं मदत कार्याला वेग येत असल्याचंही त्यांनी सांगितलंय. मात्र रस्ते खचल्यामुळं थोडा अडथळा निर्माण होत आहे.
दरम्यान, उत्तराखंडच्या फ्लॅश फ्लडमध्ये महाराष्ट्र राज्यातले १ हजार ३५३ भाविक अडकल्याची माहिती राज्य सरकारनं दिलीय. आज झालेल्या कॅबिनेटमध्ये यावर विस्तृत चर्चा झाली. राज्यातल्या एका भाविक महिलेचा या जलप्रलयात मृत्यू झाला. त्या दिशेनं सरकार चौकशी करत आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, June 19, 2013, 19:07