मॅच हरल्यानंतर लपली नाही युवीची 'विराट' निराशा, virat & yuvraj singh after lost world cup final

मॅच हरल्यानंतर लपली नाही युवीची 'विराट' निराशा

मॅच हरल्यानंतर लपली नाही युवीची 'विराट' निराशा
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

रविवारी झालेल्या वर्ल्डकप ट्वेन्टी-२० चा फायनल सामन्यात टीम इंडियाला श्रीलंकेकडून पराभवाचा चांगलाच धक्का बसला. याचा परिणाम, युवराज सिंह आणि विराट कोहली या दोन मित्रांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता. यावेळी, दोघांमध्ये किंचितसा तणावही दिसून आला.

युवराज सिंह आणि विराट कोहली यांच्यातील मैत्री तर साऱ्या जगालाच माहित आहे. अनेकदा युवीच्या खांद्यावर संपूर्ण मैदानात फिरणारा... कधी युवीला आपल्या कवेत सामावून घेणारा... तर कधी युवीच्या कडेवर बसून कल्ला करणारा विराट युवीइतकाच निराश या फायनल सामन्यानंतर दिसत होता. या मॅचमध्ये विराटला `मॅन ऑफ द टूर्नामेंट` म्हणून गौरविण्यात आलं.

मॅच संपल्यानंतर प्रेझेंटेशन दरम्यान जेव्हा युवी विराटला शुभेच्छा देण्यासाठी पुढे आला तेव्हा विराट आपल्या मोबाईलवर काही तरी करत होता. युवीनं विराटशी हात मिळवला परंतु, त्याच्याकडे बोलण्यासारखं काहीही नव्हतं. दोघंही शांतपणे एकमेकांकडे पाहत राहिले. दोघांनाही हा पराभव चांगलाच चटका लावून गेलेला दिसला.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 8, 2014, 11:20


comments powered by Disqus