24taas.com indian student discovered a commet

भारतीय विद्यार्थ्यांने शोधला धुमकेतू

भारतीय विद्यार्थ्यांने शोधला धुमकेतू

www.24taas.com, नवी दिल्ली

दिल्लीच्या एका मुलाने नवा धुमकेतू शोधून काढला आहे. नासा आणि अंतराळ एजन्सींच्या कागदपत्रांवर आधारीत सोहो वेधशाळेतील डेटाचा आधार घेऊन या मुलाने धुमकेतू शोधला आहे. एल्कन पब्लिक स्कूलमधील १२वीमध्ये शिकत असलेल्या प्रफुल्ल शर्मा याने हा धुमकेतू शोधून काढला आहे.

या धुमकेतूला सोहो २३३३ संबोधले जात आहे. हा धुमकेतू मॅछोल्ज या धुमकेतूचा एक भाग असावा, असा अंदाज बांधला जात आहे. २००७ साली सुर्याच्या जवळ जाताना त्या धुमकेतूचा हा निखळलेला भाग असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
प्रफुल्ल शर्मा दिल्लीतील ‘सायंस पॉप्युलायझेशन असोसिएशन ऑफ कम्युनिकेटर्स अँड एज्युकेटर्स’ (स्पेस) या संस्थेचा सदस्य आहे. धुमकेतू शोधणाऱ्या जागतिक संघातही तो आहे.

ब्रिटिश अस्ट्रोनोमिकल असोसिएशननेदेखील या शोधाला पुष्टी दिली आहे. याचबरोबर एक नवा धुमकेतू म्हणून धुमकेतूंच्या यादीतही त्याचं नाव सामिल करण्यात आलं आहे.स्पेस संघटनेचे अध्यक्ष चंद्रभूषण देवगण यांनी या घटनेबद्दल सांगितलं की सोहो (सोलर अँड हेलिओस्फेरिक ऑब्जर्वेटरी)) हे छोटे धुमकेतू असतात. हे धुमकेतूही सुर्यावर आपटून नष्ट होतात.

First Published: Saturday, August 11, 2012, 17:57


comments powered by Disqus