भारतीय विद्यार्थ्याने दाखवली चूक, सव्वा आठ लाख देणार फेसबुक!

Last Updated: Tuesday, September 3, 2013, 22:48

एका भारतीय विद्यार्थ्याने फेसबुकला चूक लक्षात आणून दिली आहे. फेसबुकवर कोणीही कोणाच्या खात्यावरील छायाचित्र काढून टाकू शकतो, हे भारतीय विद्यार्थ्याने सिद्ध करून दाखविले आहे. त्यामुळे फेसबुकने या विद्यार्थ्याला आठ लाख 25 हजार रुपयांचे बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे.

जर्मनीत भारतीय विद्यार्थ्याची जीभ छाटली

Last Updated: Tuesday, January 1, 2013, 20:18

इस्लाम धर्म स्वीकारत नाही म्हणून मुस्लिम कट्टरपंथीयांनी एका भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला करून त्याची जीभ छाटल्याची धक्कादायक घटना जर्मनीमध्ये बोनन येथे घडल्याचे जर्मन पोलिसांनी सांगितले.

भारतीय विद्यार्थ्यांना १.२२ कोटींची 'गुगल' लॉटरी

Last Updated: Monday, December 10, 2012, 12:08

बिट्स पिलानी या शिक्षणसंस्थेत कम्प्युटर सायन्स इंजिनीयरिंगचे शिक्षण घेणाऱ्या तीन भारतीय विद्यार्थ्यांना गुगलनं प्रत्येकी १.२२ कोटी रुपये पगाराचं पॅकेज ऑफर केलंय.

भारतीय विद्यार्थ्यांने शोधला धुमकेतू

Last Updated: Saturday, August 11, 2012, 17:57

दिल्लीच्या एका मुलाने नवा धुमकेतू शोधून काढला आहे. नासा आणि अंतराळ एजन्सींच्या कागदपत्रांवर आधारीत सोहो वेधशाळेतील डेटाचा आधार घेऊन या मुलाने धुमकेतू शोधला आहे. एल्कन पब्लिक स्कूलमधील १२वीमध्ये शिकत असलेल्या प्रफुल्ल शर्मा याने हा धुमकेतू शोधून काढला आहे.

भारतीय विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला

Last Updated: Saturday, February 11, 2012, 23:07

परदेशात भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले करण्याचे प्रकार अजूनही सुरूच आहेत. ऑस्ट्रेलियातही असे हल्ले झाले होते. आज शनिवारी झालेला हल्ला हा इंग्लंड येथे झाला आहे. एका भारतीय विद्यार्थ्यावर काही तरुणांनी जीवघेणा हल्ला केला.

ब्रिटनमध्ये वर्णद्वेषातून भारतीय तरूणाची हत्या

Last Updated: Wednesday, December 28, 2011, 17:41

ब्रिटनमध्ये शिकणाऱ्या पुणेकर विद्यार्थ्याची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनुज बिडवे असं या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे अनुजची हत्या वर्णद्वेषातून झाल्याचा संशय आहे.