Last Updated: Friday, October 11, 2013, 21:25
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई तुम्ही जर फेसबुक युजर्सपैंकी असाल आणि तुम्हाला या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून तुम्ही ‘फेसबुक मिस्टर इंडिया’ बनता येतं, असं तुम्हाला वाटत असेल तर ही बातमी तुम्हाला निराश करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकनं ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतलाय.
आत्तापर्यंत फेसबुक युजर्सला नको असलेल्या लोकांपासून सुटकारा हवा असेल तर प्रायव्हसी सेटींगमध्ये तशी सुविधा सध्या फेसबुकमध्ये उपलब्ध आहे. परंतु, यूजर्स आता अशी सेटींग करू शकणार नाहीत कारण ही सुविधाच फेसबूकनं बंद करण्याचा निर्णय घेतलाय.
फेसबुकच्या प्रायव्हसी सेटींगमध्ये ‘हू कॅन लूक अप यूअर टाईमलाईन बाय नेम?’ असा ऑप्शन आहे यामध्ये युजर्सना आपल्याला हवं त्यापद्धतीनं सेटींग बदलणं शक्य होतं. त्यामुळे फक्त मित्र किंवा मित्रांचे मित्रचं त्यांना फेसबुकवर शोधून काढू शकत होते. परंतु आता फेसबुक या फिचरला संपुष्टात आणणार आहे.
या सुविधेचा वापर खुपच कमी लोक करतात आणि त्यामुळे सर्च ऑप्शनवरही परिणाम पडतोय, असं फेसबुकचं म्हणणं आहे. ही सुविधा बंद झाल्यानंतर युजर्स केवळ आपली पोस्ट किंवा फोटो लपवू शकतात. प्रत्येक पोस्टसाठी हा ऑप्शन उपलब्ध आहे. एखादी पोस्ट किंवा फोटो कुणी पाहावा आणि कुणी नाही किंवा कुणाला दिसू नये, असे ऑप्शन प्रत्येक पोस्टसाठी उपलब्ध असेल.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, October 11, 2013, 21:25