पॉर्न साईटवर येणार लवकरच बंदी?, Government want to banned porn sites

पॉर्न साईटवर येणार लवकरच बंदी?

पॉर्न साईटवर येणार लवकरच बंदी?
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

पॉर्न साईटसवर सरकारने हल्लाबोल करण्याचा तयारीत आहे. जवळजवळ ५४६ पॉर्न साईटवर निर्बंध येणार आहे. त्यामुळे सायबर क्राईमच्या दृष्टीने हे फार महत्त्वाचे असे काम असेल.

सरकार पॉर्न साईटवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. सायबर क्राईमने आणि गुप्तचर विभागाच्या टीमने सरकारला दिलेल्या एका रिपोर्टनंतर सरकारने पॉर्न साईट्सवर बंदी घालण्याचा विचार करीत आहे.

सायबर क्राईमने दिलेल्या रिपोर्टनुसार ६० टक्के बलात्कारातील आरोपी हे अश्लील वेबसाईटवर पॉर्न व्हिडिओ पाहूनच बलात्कार करतात असे समोर आले आहे. या रिपोर्टनंतर अशा वेबसाईटवर बंदी घालण्याची मागणी होऊ लागली आहे.

First Published: Saturday, May 4, 2013, 15:38


comments powered by Disqus