`वॉट्सअॅप`वरून अश्लील व्हिडिओ पाठवला, तरूणाला अटक, whats up issue, arrest one

`वॉट्सअॅप`वरून अश्लील व्हिडिओ पाठवला, तरूणाला अटक

`वॉट्सअॅप`वरून अश्लील व्हिडिओ पाठवला, तरूणाला अटक
www.24taas.com, मुंबई

`वॉट्सअॅप`वरून झालेला हा पहिलाच गुन्हा समोर आला आहे. ई-मेल, एसएमएसनंतर संपर्काचे सर्वात वेगवान, स्वस्त आणि पसंतीचे माध्यम ठरलेले `वॉट्सअॅप` वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. मुंबईतील एका तरुणाने ओळखीच्या महिलेला `वॉट्सअॅप`वरून चक्क ब्ल्यू फिल्म पाठवल्याचे उघड झाले आहे. या तरुणाला व्ही. पी. रोड पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेल्या तरुणाचे नाव प्रवीण राजन असे असून तो चेंबूरच्या डायमंड गार्डन परिसरात राहतो. प्रवीणची गर्लफ्रेंड मिशेल इंजिनीअर हिने दक्षिण मुंबईतील एका महिलेशी त्याची ओळख करून दिली. या महिलेवर भाळलेला प्रवीण ओळख झाल्यापासून तिच्याशी जवळीक साधू पाहत होता.

वॉट्सअपवरून प्रवीण तिला सतत अश्लील मेसेज पाठवू लागला. महिलेने याचा जाब विचारल्याने तो खवळला. त्याने तिला धमकावण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर १७ मार्चला प्रवीणने वॉट्सअपवरून विवाहितेच्या मोबाइलवर अर्ध्या तासाचा अश्लील चित्रपट पाठवला.

First Published: Friday, April 26, 2013, 16:42


comments powered by Disqus