Last Updated: Wednesday, September 18, 2013, 17:09
www.24taas.com, झी मीडिया, चेन्नईजगात दुसऱ्यांदा आणि भारतात पहिल्यांदाच डॉक्टरांनी गुगल ग्लासचा वापर करून दोन यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. चेन्नईतील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये गुगल ग्लासद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आल्या. जे. एस. राजकुमार आणि त्यांच्या टीमने वजन कमी करण्याची सर्जरी आणि अँटी अँसिड रिफ्लक्स प्रक्रियाही गुगल ग्लासद्वारे करण्यात आली.
गुगल ग्लास हे यंत्र डॉक्टर एखाद्या चष्म्याप्रमाणे वापरू शकतात. या चष्म्याला वाय फाय नेटवर्क असतं. तसंच माइक आणि कॅमेराही असतो. या कॅमेऱ्याद्वारे व्हिडिओचं थेट प्रक्षेपण पाहाता येतं. “या तंत्रज्ञानाने वैद्यकीय क्षेत्रात खूप मोठी क्रांती घडणार आहे.” असं भाकित डॉ. राजकुमारनी केलं आहे. या तंत्रज्ञानामुळे सर्जरीचा चेहरा मोहराच बदलून जाणार आहे.
या तंत्रज्ञानामुळे कुणीही शस्त्रक्रियेचं वेगळ्या ठिकाणाहून थेट प्रक्षेपण पाहू शकतं आणि त्याबरहुकुम सूचना देऊ शकतं. या सूचना गुगल ग्लास घातलेले डॉक्टर ऐकून त्यानुसार शस्त्रक्रिया करू शकतात. मेडिकल्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रकार खूप उपयुक्त ठरणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, September 18, 2013, 17:03