आता तुमच्या स्मार्टफोनमधून करा थ्रीडी फोटो क्लिक now take 3D photo from your mobile

आता तुमच्या स्मार्टफोनमधून करा थ्रीडी फोटो क्लिक

आता तुमच्या स्मार्टफोनमधून करा थ्रीडी फोटो क्लिक
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

स्मार्टफोनचा वापर करणाऱ्यांना आता आपल्या फोनवरूनही थ्रीडी फोटो काढता येणं शक्य होणार आहे. कारण, लवकरच बाजारात `सीन` नावाचं एक अॅप्लिकेशन येतंय. `सीन` तुमच्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यानं थ्रीडी फोटो काढण्यास मदत करेल.

मोबाईल अॅप्लिकेशन `सीन`चं नवीन व्हर्जन थ्रीडी सुविधेसह लवकरच बाजारात दाखल होणार आहे. या व्हर्जनला कोणत्याही स्मार्टफोनमध्ये वापरता येईल. यासाठी स्मार्टफोनमध्ये कूठल्याही प्रकारच्या नवीन हार्डवेअरची गरज लागणार नाही. याआधी अॅपलच्या स्मार्टफोनमध्ये टूडी फोटोला थ्रीडीमध्ये रुपांतरीत करण्याची सुविधा उपलब्ध होती.


याआधी, `सीन`च्या मदतीनं स्मार्टफोनला डावीकडं आणि उजवीकडं वळवून थ्रीडी फोटोचा अनुभव घेता येत होता. आता मात्र, याच अॅप्लिकेशनच्या सहाय्याने तुम्हाला थेट थ्रीडी फोटोच क्लिक करता येणार आहे. सीनचं नवीन व्हर्जन बाजारात लवकरच लॉन्च होईल, अशी माहिती सुत्रांकडून मिळतेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, May 11, 2014, 12:55


comments powered by Disqus