‘मनरेगा’द्वारं आता मिळणार फोन आणि इंटरनेटUnder `NREGA` Scheme phone & internet available to rural peoples

‘मनरेगा’द्वारं आता मिळणार फोन आणि इंटरनेट

‘मनरेगा’द्वारं आता मिळणार फोन आणि इंटरनेट
www.24taas.com, पीटीआय, नवी दिल्ली

२०१४ लोकसभा निवडणुकीच्या प्रार्श्वभूमिवर सरकार नवनवीन योजना जाहीर करतंय. आता एक नवी योजना सरकारनं जाहीर केलीय. ती म्हणजे आता राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) देशातल्या अडीच कोटी लोकांना मोबाईल आणि इंटरनेट सरकार देणार आहे.

ग्रामीण भागात मोबाईल सेवेचा विस्तार करण्यासाठी ही योजना जाहीर केल्याचं बोललं जातंय. या योजनेअंतर्गत मनरेगामध्ये नोंदणी करण्यात आलेल्या प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला इंटरनेट सुविधा असलेला मोबाईल फोन देण्यात येणार आहे. तसंच, पुढील दोन वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला ३० रुपयांचं रिचार्जही मोफत मिळेल. त्यात ३० मिनिंटांचा टॉकटाईम, ३० एसएमएस आणि ३० एमबीपीएस इंटरनेटा डेटा उपलब्ध करुन दिला जाईल.

मात्र ३० मिनिटांची मर्यादा ओलांडल्यास त्यापुढील सेवेसाठीचा खर्च ग्राहकाला स्वतः करावा लागणार आहे. हा मोबाईल फोन घेण्यासाठी सुरुवातीला तीनशे रुपये भरावं लागणार आहे. देशभरातील अडीच कोटी लाभधारकांपर्यंत ही योजना पोचविण्यासाठी चार वर्षांच्या काळात सुमारे चार हजार ८५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ‘यूएसओएफ`च्या माध्यमातून हा खर्च केला जाणार आहे.

बीएसएनएलकडून १२०० रुपये किमतीचा हॅंडसेट लाभार्थिंना मिळणार आहे. कृषी, आरोग्य, शिक्षण, वित्त आदी सेवा, कौशल्य विकास आणि रोजगारासंदर्भातील माहिती ग्रामीण नागरिकांना या योजनेद्वारं सहजासहजी उपलब्ध होणार आहे.

पहिल्या वर्षी देशातील २५ लाख लाभार्थिंना मोबाईल संच मिळणार आहेत, तर दुसऱ्या वर्षी ५० लाख लाभार्थिंची त्यात भर पडेल. या योजनेमध्ये सरकार लाभधारक कुटुंबातील महिलांना प्राधान्य देणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, September 30, 2013, 14:11


comments powered by Disqus