बोट अपघात, ठाण्याच्या भोसेकर कुटुंबावर शोककळा, Andaman and Nicobar Islands boat accidents

बोट अपघात, ठाण्याच्या भोसेकरांवर शोककळा

बोट अपघात, ठाण्याच्या भोसेकरांवर शोककळा
www.24taas.com झी मीडिया , अंदमान/ ठाणे

अंदमान निकोबारजवळ अॅक्वा मरिना बोट अपघातात ठाण्याच्या रोटरी क्लबचे चंद्रशेखर भोसेकर आणि त्यांच्या पत्नी अलका यांचा मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या दोन मुलांना वाचवण्यात यश आलंय.

अंदमान निकोबारजवळ अक्वा मरिना बोट बुडाली. दुपारी चारच्या सुमारास ही बोट बुडालीय. या बोटीवर ४० प्रवासी होते. २१ जणांना जलसमाधी मिळाली. तर१८ प्रवशांना वाचवण्यात यश आलंय. अपघातानंतर लगेचच प्रवाशांसाठी मदतकार्य सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

तामिळनाडूच्या कांचीपूरम येथून प्रवाशांना घेऊन ही बोट चालली होती. दुपारी ४च्या सुमारास अपघात झाला. ही बोट उलटल्याने काही प्रवासी पाण्यात बुडाले. दरम्यान, अंदामान आणि निकोबारच्या नायब राज्यपालांनी मृतकांच्या नातेवाईकांना १ लाख रुपयाची मदत जाहीर केली आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Sunday, January 26, 2014, 23:39


comments powered by Disqus