अपघाताची जबाबदारी स्वीकारत द.कोरियाच्या पंतप्रधानांचा राजीनामा

Last Updated: Sunday, April 27, 2014, 17:51

दक्षिण कोरियाचे पंतप्रधान चंग हाँग वोन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. 11 दिवसांपूर्वी फेरी बोटला झालेल्या अपघाताची पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत हा राजीनामा दिलाय. या अपघातात 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे.

अंदमान बोट अपघात: हेल्पलाईन नंबर

Last Updated: Monday, January 27, 2014, 14:42

अंदमान निकोबारमध्ये प्रवासी बोट बुडाल्यानं झालेल्या अपघातामध्ये २१ जणांना जलसमाधी मिळालीय. नॉर्थ बे बेटाजवळ अक्वा मरिना ही प्रवासी बोट बुडाली. या बोटीवर ४० प्रवासी असल्याची माहिती मिळतेय. तामिळनाडू आणि मुंबईतल्या काही प्रवाशांसह क्रू मेंबरचा या प्रवाशांमध्ये समावेश होता.

बोट अपघात, ठाण्याच्या भोसेकरांवर शोककळा

Last Updated: Monday, January 27, 2014, 14:43

अंदमान निकोबारजवळ अॅक्वा मरिना बोट अपघातात ठाण्याच्या रोटरी क्लबचे चंद्रशेखर भोसेकर आणि त्यांच्या पत्नी अलका यांचा मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या दोन मुलांना वाचवण्यात यश आलंय.

अंदमानमध्ये बोट बुडून २१ जणांना जलसमाधी

Last Updated: Monday, January 27, 2014, 14:44

अंदमान निकोबारजवळ नॉर्थ बे येथे अॅक्वा मरिना बोट बुडाली. या बोटीतील २१ जणांना जलसमाधी मिळाली. यामध्ये ठाण्यातील दोघांचा मृत्यू झाला. दुपारी चारच्या सुमारास ही बोट बुडालीय.

वर्धात वणा नदीत बोट बुडाली

Last Updated: Friday, August 9, 2013, 10:43

वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाटमध्ये वणा नदीत बोट उलटल्यानं झाल्यानं अपघातामध्ये आठ जणांना जलसमाधी मिळालीय. तर पाच जण बेपत्ता आहेत. पावसामुळे मदत कार्यात अडथळा येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.