अंदमान बोट अपघात: हेल्पलाईन नंबर

Last Updated: Monday, January 27, 2014, 14:42

अंदमान निकोबारमध्ये प्रवासी बोट बुडाल्यानं झालेल्या अपघातामध्ये २१ जणांना जलसमाधी मिळालीय. नॉर्थ बे बेटाजवळ अक्वा मरिना ही प्रवासी बोट बुडाली. या बोटीवर ४० प्रवासी असल्याची माहिती मिळतेय. तामिळनाडू आणि मुंबईतल्या काही प्रवाशांसह क्रू मेंबरचा या प्रवाशांमध्ये समावेश होता.

बोट अपघात, ठाण्याच्या भोसेकरांवर शोककळा

Last Updated: Monday, January 27, 2014, 14:43

अंदमान निकोबारजवळ अॅक्वा मरिना बोट अपघातात ठाण्याच्या रोटरी क्लबचे चंद्रशेखर भोसेकर आणि त्यांच्या पत्नी अलका यांचा मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या दोन मुलांना वाचवण्यात यश आलंय.

अंदमानमध्ये बोट बुडून २१ जणांना जलसमाधी

Last Updated: Monday, January 27, 2014, 14:44

अंदमान निकोबारजवळ नॉर्थ बे येथे अॅक्वा मरिना बोट बुडाली. या बोटीतील २१ जणांना जलसमाधी मिळाली. यामध्ये ठाण्यातील दोघांचा मृत्यू झाला. दुपारी चारच्या सुमारास ही बोट बुडालीय.

नेव्हीच्या जहाजाची बोटीला धडक

Last Updated: Tuesday, December 24, 2013, 18:59

नेव्हीच्या जहाजाने धडक दिल्याने समुद्रात मच्छिमारी करणाऱ्या अलसौबान या बोटीला जलसमाधी मिळालीय. काल रात्री ही घटना दापोली तालुक्यातल्या हर्णे बंदरात घडलीय. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

वर्धात वणा नदीत बोट बुडाली

Last Updated: Friday, August 9, 2013, 10:43

वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाटमध्ये वणा नदीत बोट उलटल्यानं झाल्यानं अपघातामध्ये आठ जणांना जलसमाधी मिळालीय. तर पाच जण बेपत्ता आहेत. पावसामुळे मदत कार्यात अडथळा येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ऐतिहासिक `विक्रांत` भंगारात जाणार?

Last Updated: Friday, November 30, 2012, 10:01

१९७१च्या पाकिस्तान युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावलेल्या, एकेकाळी भारतीय नौदलाची शान असलेल्या आयएमएस विक्रांत या विमानवाहू युद्ध नौकेचे भवितव्य अंधारात आहे.

दीडशे वर्षांनंतर 'भाऊ' धक्क्यालाच

Last Updated: Saturday, June 9, 2012, 18:03

एकेकाळी कोकणी आणि गोंयकार प्रवाशांनी गजबजणाऱ्या मुंबईतील भाऊच्या धक्क्य़ाला यंदा दीडशे र्वष पूर्ण होत आहेत. मात्र, येथील समस्या आजही दीडशे वर्षानंतर कायम आहे. त्यामुळे भाऊच्या धक्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. दीडशे वर्षांनंतर जुन्याच बोटींने प्रवास करावा लागत असल्याने हा प्रवास जीवावर बेतण्याची शक्यता आहे.

आसाममध्ये नौका उलटून १०० मृत्युमुखी

Last Updated: Tuesday, May 1, 2012, 10:47

आसामध्ये नौका दुर्घटनेत १०० जणांचा बळी गेल्याची घटना घडली तर १०० पेक्षा जास्त लोक बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. आसाममधील हा सर्वात मोठा अपघात आहे.

अलाहबादमध्ये नौकाडुबी, दोन भाविकांना जलसमाधी

Last Updated: Saturday, March 17, 2012, 10:44

अलाहबाद येथे संगमावर भाविकांना वाहून नेत असलेली होडी बुडून महाराष्ट्रातील २ भाविकांचा मृत्यू झाला आहे. संध्याकाळच्या वेळेस या नौकेतून १४ भाविक संगमामध्ये डुबकी घेण्यासाठी निघाले होते. हे सर्व भाविक महाराष्ट्रातील होते.

ऑस्ट्रेलियात जहाजाला जलसमाधी

Last Updated: Thursday, February 2, 2012, 13:41

ऑस्ट्रेलियात जवळपास ३५० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या जहाजाला जलसमाधी मिळाल्याची भिती वर्तविण्यात आली आहे. या वृत्ताला ऑस्टेलियाचे पंतप्रधान जुलिया गिलर्ड यांनी दुजोला दिला आहे. ही घटना पपुआ नवी गुईनी येथे घडली.