धान्य महागलं... तोंडात काय बोटं घालणार?

धान्य महागलं... तोंडात काय बोटं घालणार?

धान्य महागलं... तोंडात काय बोटं घालणार?
www.24taas.com, नवी मुंबई
महाराष्ट्राच्या काही भागांत पावसानं तुरळक हजेरी लावलीय. त्यातच इंधनांच्या किंमतीत झालेली वाढ... यामुळे अन्नधान्यांच्या किंमतीत चांगलीच वाढ झालीय. साखर, ज्वारी, बाजरीचे दर चांगलेच वाढलेत. २५ टक्क्यांनी धान्य महाग झालेत. अजूनही पाऊस झाला नाही तर आणखी भाव वाढण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यातच सणही तोंडावर येऊन ठेपलेत, व्यापाऱ्यांसाठी ही तर नफा कमवण्याची वेळ... त्यामुळे सर्वसामान्यांना मात्र चांगलाच आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.



धान्याचे घाऊक बाजारातले दर
धान्य जुलै ऑगस्ट

तूरडाळ ६० रु. किलो ७० ते ७२ रु. किलो

मूगडाळ ६० रु. किलो ७० ते ७२ रु. किलो

चणाडाळ ५५ रु. किलो ७० रु. किलो

उडीद दाळ ५७ रु. किलो ७२ रु. किलो

साखर ३२-३५ रु. किलो ४० रु. किलो

ज्वारी १३-१४ रु. किलो १६-१७ रु. किलो

First Published: Thursday, August 9, 2012, 13:28


comments powered by Disqus