कोकणात धुव्वाधार, रेल्वे वाहतूक विस्कळीत, heavy rainfall in the Konkan region

कोकणात धुव्वाधार, रेल्वे वाहतूक विस्कळीत

कोकणात धुव्वाधार, रेल्वे वाहतूक विस्कळीत
www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी

कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दोन्ही जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. रत्नागिरीत खेड,चिपळूण, राजापूर आणि संगमेश्वर येथील नद्यांना पूर आलायं कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय.

निवसर कोंडवीजवळ रेल्वे रुळाखालील माती वाहून गेल्यानं वाहतूक विस्कळीत झालीय. त्यामुळं वाहतूक धिम्या गतीनं सुरूय. कोकणात येत्या २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. तर चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलीय. बाजारपेठेतही पाणी घुसण्यासही सुरुवात झालीय.

कोकणात हायटाईडचा इशारा कोकणातही पावसाचा जोर कायम आहे. रत्नागिरीत समुद्राला उधाण आलं असून, भरतीच्या लाटांमुळे संरक्षक बंधारा वाहून गेला आहे. मी-या बंधा-यावरील संरक्षक बंधा-याचा हा भाग लाटांमुळे वाहून गेला आहे. येत्या ४८ तासांत कोकणात मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.

कोकण किनारपट्टी भागात आतापर्यंत २५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरीतील निवसर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. कोकण रेल्वेने जारी केलेल्या पत्रकानुसार खचलेल्या मार्गावर अंदाजे तासी २० किमी वेगाने गाड्या चालवल्या जात आहेत. मात्र अद्याप कोकण रेल्वे मार्गावरील कोणतीही गाडी रद्द करण्यात आलेली नाही. रेल्वेरुळ सायंकाळपर्यंत दुरुस्त केला जाईल असे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, July 23, 2013, 16:21


comments powered by Disqus