Last Updated: Thursday, April 18, 2013, 16:29
www.24taas.com, ठाणेठाणे बंदला हिंसक वळण लागल्यामुळे बहुतांश टीएमटी बसेस रस्त्यावर न उतरल्यानं वागळे आगारात मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. बसेस तातडीनं सुरू करण्याची मागणी करत मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. ठाणे बंदला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केलाय. त्यामुळे बसेस सुरू करण्याची मनसेची मागणी होती.
ठाण्यात बंदच्या माध्यमातून लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. रात्रीच स्थानिक नेते बंदसाठी लोकांवर दबाव आणताना दिसत होते. ४ टीएमटी,२ एसटी आणि १ खासगी बस फोडण्यात आली. तीन छोटी वाहनंही फोडण्यात आली.
याशिवाय बसेसची हवा काढून त्या रस्त्यात अडवून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्टंटबाज राजकीय नेत्यांनी रात्रीपासून बंदची वातावरणनिर्मिती केल्यानं सकाळपासून ठाण्यातल्या बाजारपेठांत शुकशुकाट होता. ठाण्यात रिक्षासेवाही बंद आहे.
First Published: Thursday, April 18, 2013, 16:29