Last Updated: Monday, May 27, 2013, 12:02
www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबई मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर रविवारी सायंकाळी कार्ल्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुबातील चार जण जागीच ठार झालेत. तर एकाचा रूग्णालायात मृत्यू झाला. वासकर कुटुंब देवदर्शनासाठी गेले होते.
नवी मुंबईतील खारघर येथील हे कुटुंब एकविरा देवीच्या दर्शनासाठी कार्ला गडावर आले होते. देवाचे दर्शन घेऊन घरी परतताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. गाडीचालकाचा ताबा सुटल्याने भरधाव वेगातील स्विफ्ट कार रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरक्षा भिंतीवर आदळली. या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातातील मृतांतमध्ये जनार्दन चांगा वासकर (६५), लिलाबाई जनार्दन वासकर (६०), रवींद्र जनार्दन वासकर (३५) आणि रुपेश जनार्दन वासकर (२८) यांचा समावेश आहे. तर सुवर्णा जनार्दन वासकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात एक पाच वर्षाची बालिका सुखरुप बचावली आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, May 27, 2013, 12:02