`दादा`गिरी करणाऱ्यांचे हात मुळासकट उखडून टाकू - उद्धव ठाकरे, Narayan Rane vs Uddhav Thackeray

`दादा`गिरी करणाऱ्यांचे हात मुळासकट उखडून टाकू - उद्धव ठाकरे

`दादा`गिरी करणाऱ्यांचे हात मुळासकट उखडून टाकू - उद्धव ठाकरे
www.24taas.com, झी मीडिया, कणकवली

माझ्या शिवसैनिकांच्या वाट्याला जाऊ नको. याचा चांगला परिणाम होणार नाही. येथे काँग्रेसची दादागिरी चालणार नाही. उगारणारा हात मुळासकट उखडून टाकू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्योग मंत्री नारायण राणे यांना दिला.

कोकणचा विकास केला म्हणणार्‍यांनी स्वत:चाच विकास केला. आपली घराणी मोठी केली.
अन्यायाविरुद्ध लढताना दंडुके पडणार असतील तर ते तोडून टाकल्याशिवाय राहणार नाही.
शिवसैनिक पळत नाही, तर पळवतो. नारायण राणे यांच्याकडून `सुपारी` घेऊन सिंधुदुर्ग पोलिसांनी रविवारी शिवसैनिकांना अमानुष मारहाण केली. पोलिसांची ही गुंडागर्दी मोडून काढण्यासाठी शिवसैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले, असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी येथे केले.

कोकणभूमी ही देवभूमी आहे. इथे जास्त दिवस दहशतवाद खपवून घेतला जात नाही, जाणार नाही. काँग्रेसची `दादा`गिरी संपली, आता त्यांचे राजकीय थडगे बांधणार, असा असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. धुमश्‍चक्रीनंतर उद्धव ठाकरे कणकवलीत आले होते. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना विधिमंडळ पक्षनेते सुभाष देसाई, शिवसेना नेते खासदार संजय राऊत होते. त्यावेळी हा इशारा दिला.

भाडोत्री गुंडांनी काँग्रेसला बदनाम केले आहे. शिवसेनेच्या आधारावरच काहीजण `दादा` झाले. पण आमच्या वैभव नाईकने त्याची लक्तरेच काढली. एक शिवसैनिक तुमच्यासमोर आला तर तुमची ही गत झाली. संपूर्ण शिवसेना आली असती तर तुमचे काय झाले असते याचा विचार करा, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Wednesday, November 27, 2013, 08:17


comments powered by Disqus