नारायण राणेंची आक्रमक स्टाईल नव्या वळणावर

Last Updated: Friday, June 6, 2014, 18:30

काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेले नारायण राणे लवकरच राजकीय भूकंप घडवण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्य़ा राजकारणात वादळ निर्माण झालंय. नव्वदच्या दशकात राजकीय कारकिर्द सुरु करणा-या राणेंनी कायम आक्रमक राजकारण केलं. पण राजकारणातील त्यांची आक्रमक स्टाइलच दरवेळी त्यांना नव्या वळणावर घेऊन गेली.

भोस्ते घाटात बस दरीत कोसळली; 30 जखमी

Last Updated: Sunday, May 25, 2014, 10:08

कणकवली-मुंबई रातराणी एसटी बसला झालेल्या अपघातामध्ये 30 जण जखमी झालेत. या अपघातात कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही.

`दादा`गिरी करणाऱ्यांचे हात मुळासकट उखडून टाकू - उद्धव ठाकरे

Last Updated: Wednesday, November 27, 2013, 08:19

माझ्या शिवसैनिकांच्या वाट्याला जाऊ नको. याचा चांगला परिणाम होणार नाही. येथे काँग्रेसची दादागिरी चालणार नाही. उगारणारा हात मुळासकट उखडून टाकू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्योग मंत्री नारायण राणे यांना दिला.

पोलिसांनी सुपारी घेऊन केला शिवसैनिकांवर हल्ला - उद्धव

Last Updated: Tuesday, November 26, 2013, 15:37

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. इथं दाखल झाल्यानंतर त्यांनी कणकवलीत शिवसैनिकांशी संवाद साधला.