राष्ट्रवादीच्या नगरसेवक आणि सभापतीची गाडी जाळली, Ncp corporater`s car set to fire

राष्ट्रवादीच्या नगरसेवक आणि सभापतीची गाडी जाळली

राष्ट्रवादीच्या नगरसेवक आणि सभापतीची गाडी जाळली

www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबई
नवी मुंबई महापालिकेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक नवीन गवते आणि पालिका शिक्षण उप सभापती विवेक सिंग यांची गाडी अज्ञात इसमांनी बुधवारी रात्री जाळली. राजकीय वादातून हा प्रकार घडल्याचं बोललं जातंय.

शिवसेनेचं हे कारस्थान असल्याचा आरोप गवते यांनी केलाय. नवीन गवते यांच्या कार्यालयासमोर लावण्यात आलेली फॉर्च्युनर कार आणि शिक्षण समितीचे उपसभापती विवेक सिंग यांची इनोव्हा बुधवारी रात्री जाळण्यात आली.

याप्रकरणी एमआयडीसी रबाळे पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्य़ात आलाय. शिवसेनेच्या सुभाष काळे आणि नाना मोरे यांनी हा प्रकार केल्याचा गवते यांचा आरोप आहे. शिवसेनेनं मात्र हे आरोप फेटाळलेत.

दिघा विभाग हा अतीसंवेदनशील म्हणून ओळखला जातो. या विभागात आधीही राजकीय वैमनस्यातून अनेक हल्ले झाले आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, June 6, 2013, 21:00


comments powered by Disqus