ठाणे पालिका राडा, सेना-भाजपच्या ५ जणांना अटक

Last Updated: Thursday, December 26, 2013, 12:48

ठाण्यामधल्या उपमहापौर मिलिंद पाटणकर यांच्या केबिनच्या तोडफोडप्रकरणी शिवसेना आणि भाजपच्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. नौपाडा पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

ठाणे पालिकेत उपमहापौरांना चोपले, वरिष्ठांच्या भेटीनंतर नॉट रिचेबल

Last Updated: Tuesday, December 24, 2013, 09:38

ठाणे महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेला परिवहन समितीच्या निवडणुकीत युतीच्या पराभवाला कारण ठरलेले उपमहापौर मिलिंद पाटणकर कालपासून नॉट रिचेबल आहेत. काल रात्री शिवसेनेचे काही नेते आणि मिलिंद पाटणकरांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. दरम्यान, त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यामुळे पालिकेत राजकीय राडा पाहायला मिळाला.

राष्ट्रवादीच्या नगरसेवक आणि सभापतीची गाडी जाळली

Last Updated: Thursday, June 6, 2013, 21:00

नवी मुंबई महापालिकेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक नवीन गवते आणि पालिका शिक्षण उप सभापती विवेक सिंग यांची गाडी अज्ञात इसमांनी बुधवारी रात्री जाळली. राजकीय वादातून हा प्रकार घडल्याचं बोललं जातंय.

... आणि ठाकरे बंधुंची एकी पुन्हा दिसून आली!

Last Updated: Saturday, April 20, 2013, 20:05

नाशिक मनपा स्थायी समिती सभापतीपदी मनसेचे रमेश घोंगडे विजयी झालेत. घोंगडे १० विरुद्ध ६ मतांनी विजयी झालेत.

नक्षलवाद्यांकडून भामरागड सभापतींची हत्या

Last Updated: Saturday, January 28, 2012, 11:42

गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा नक्षलवाद्यांनी धुडगूस घातला आहे. भामरागड पंचायत समितीचे सभापती बहादुरशहा आलम यांची नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकारामुळे नक्षलवादी पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे स्पष्ट झाले आहे.