Last Updated: Tuesday, October 16, 2012, 17:50
www.24taas.com, नवी मुंबईगाडीला रस्ता देण्याच्या वादातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री दिघ्याच्या साठेनगरमधील रहिवाशांवर लाठ्या-काठ्या आणि लोखंडी गजांनी हल्ला केला. यात आठ जण जबर जखमी झाले असून त्यांना वाशी येथील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दिघा परिसरातील बिंदुमाधव नगरमध्ये आज एमआयडीसीने तोडफोड मोहीम हात घेतली होती. राष्ट्रवादीचे नगरसेवक नवीन गवते यांच्या कार्यकर्त्यांनी बिंदुमाधव नगरच्या दोन्ही रस्त्यावर स्टेज बांधून ठेवले. त्यामुळे येथे एका घरी आलेल्या पाहुण्यांची कार अडकून पडली.
गाडी निघेपर्यंत काही टेबल बाजूला करा, अशी विनंती कारच्या मालकाने केली. मात्र टेबल बाजूला न करता सुनील जाधव यांच्यासह तेथील रहिवाशांवर लाठ्या-काठ्या आणि लोखंडी गजांनी हल्ला केला.
First Published: Tuesday, October 16, 2012, 17:37