कोर्टानं काढली लालू समर्थकांच्या फटाक्यांची वात!

Last Updated: Monday, September 30, 2013, 13:44

सीबीआयचं विशेष कोर्ट लालू प्रसाद यादव यांना दिलासा देईल अशी त्यांच्या समर्थकांना आशा होती. मात्र आता ती मावळलीय. कारण कोर्टानं त्यांना दोषी ठरवलंय. त्यामुळं सेलिब्रेशनसाठी आणलेले फटाके तसेच राहिलेत.

सध्याच्या परिस्थितीतून भाजपच देश वाचवू शकतो- मोदी

Last Updated: Sunday, September 22, 2013, 10:26

भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी युपीए सरकारवर तोफ डागलीय. देशातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला हटविण्यासाठी १९७७ प्रमाणे २०१४मध्ये नागरिकांनी पुढं येऊन परिवर्तन होण्याची गरज असल्याचंही मोदी म्हणाले आहेत. मोदींना आज परदेशातील भारतीय नागरिकांसोबत व्हिडिओ कॉन्फर्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

ठाकरे हे हिंदुत्वाचे कट्टर समर्थक - बीबीसी

Last Updated: Sunday, November 18, 2012, 00:43

महाराष्ट्र राजकारणात दशकापासून बाळ ठाकरे यांचा दबदबा होता. ठाकरे हे हिंदुत्वाचे कट्टर समर्थक होते, त्यांचा महाराष्ट्राबरोबच खास करून मुंबईवर मोठा प्रभाव होता, असे बीबीसीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा, अनेक जखमी

Last Updated: Tuesday, October 16, 2012, 17:50

गाडीला रस्ता देण्याच्या वादातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री दिघ्याच्या साठेनगरमधील रहिवाशांवर लाठ्या-काठ्या आणि लोखंडी गजांनी हल्ला केला.

भाजपचा पाठिंबा, नाशकात मनसेचा महापौर

Last Updated: Thursday, March 15, 2012, 11:06

नाशिकच्या महापौरपदाची निवडणूक आज होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाठिंबा देण्याचे निश्चित केले आहे. त्याबाबतची आज घोषणा थोड्याच वेळात करण्यात येणार आहे. या पाठिंब्यामुळे नाशकात मनसेचा पहिला महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मनसेचे महापौरासाठी २ उमेदवार!

Last Updated: Friday, March 9, 2012, 17:44

मनसे महापौरपदासाठी दोन उमेदवार उभे करणार आहे. दगाफटका टाळण्यासाठी मनसेतर्फे शशिकांत जाधव आणि यतीन वाघ महापौरपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. तर उपमहापौरपदासाठी रमेश धोंबडे आणि अशोक मुर्तडक अर्ज दाखल करणार आहेत

मनसेला पाठिंबा देण्याचे भाजपचे संकेत

Last Updated: Friday, March 9, 2012, 19:48

नाशिकमध्ये जनादेशाचा आदर केला जाईल असं सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी मनसेला पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. त्यातच शिवसेनेनं महापौरपदासाठी दावा केला आहे. त्यासाठी अपक्षांची जुळवाजुळव सुरू आहे. बहुमतासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेणार अशीची चर्चा आहे.

नाशिक महापौरपदाचा गुंता वाढला

Last Updated: Friday, March 9, 2012, 17:44

नाशिकमध्ये महापौरपदाचा तिढा वाढलाय. शिवसेनेनं महापौरपदासाठी हालचाली सुरू केल्यात. त्यासाठी अपक्षांची जुळवाजुळव सुरू आहे. बहुमतासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेणार अशी चर्चा आहे. तर भाजप मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय.

सोनियांच्या पोस्टर काळे, कार्यकर्ते भिडले

Last Updated: Monday, January 16, 2012, 18:01

दिल्लीत बाबा रामदेव आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. काँग्रेस मुख्यालयाबाहेरच हा गोंधळ झाला. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या पोस्टरला काळं फासल्यानंतर हा गोंधळ झाला.