राज्यात पाऊस, वीज कोसळून 4 ठार, Rain of Maharashtra state, power collapse 4 killed

राज्यात पाऊस, वीज कोसळून 4 ठार

राज्यात पाऊस, वीज कोसळून 4 ठार
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

राज्यात वीज कोसळून चार जणांचा मृत्यू झालाय. बुलडाणा जिल्ह्यात साखरखेडा गावात वीज कोसळून एक जण ठार तर चार जण जखमी झालेत.

संतोष चांगाडे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. तर नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन गावातही वीज कोसळून दोन जण ठार झालेत. तर कोल्हापुरात एकाचा मृत्यू झालाय. कोकण, कोल्हापूर, औरंगाबादमध्ये गारांसह अवकाळी पाऊस झालाय. मराठवाड्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसानं पुन्हा हजेरी लावलीये.

औरंगाबादसह उस्मानाबाद, जालना, हिंगोली जिल्ह्यात काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी वादळी वारा आणि गारांचा पाऊस झाल्यानं बागायती शेतीचं नुकसान झालंय. द्राक्षं, अंबा, मोसंबीच्या बागांना पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसलाय.

दोन दिवसात मराठवाड्यात वीज पडून आणि झाडं पडल्यानं ४ जणांचा बळी घेतलाय. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्याता पावसानं झोपपलंय. कोल्हापूरमध्येही पाऊस आणि गारांनी दणका दिलाय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, April 19, 2014, 18:30


comments powered by Disqus