Last Updated: Wednesday, June 26, 2013, 16:07
www.24taas.com, झी मीडिया, राजापूर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे ९१ दिवसांत गंगेचा पुनरागमन झाले आहे. दर तीन वर्षांनी गंगा अवतरते. मात्र, वर्षभराच्या विक्रमी वास्तव्यानंतर निर्गमन झालेल्या गंगेचे दोन दिवसांपूर्वीच आगमन झाले आहे.
राज्यात राजापूरची गंगा प्रसिद्ध आहे. गंगेच्या स्नानासाठी अनेक भाविक राजापूरकडे धाव घेतात. ऐन पावसाळ्यात गंगा अवतरल्याने भाविकांना आनंद द्विगुणीत झाला आहे. गंगा आल्याचे समजताच गंगा कुंडावर भाविकांची गर्दी दिसून येत आहे.
गंगातीर्थक्षेत्री मूळ गंगा, गायमुखामधून जोरदार पाण्याचा प्रवाह सुरू झालाय. तर अन्य कुंडात (एकूण पाच कुंड) मुबलक पाणीसाठा झाला आहे. गेल्या ११ एप्रिल २०१३ रोजी उन्हाळे तीर्थक्षेत्री गंगा अवतीर्ण झाली होती.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, June 26, 2013, 16:05