त्र्यंबकेश्वर पालिका नगराध्यक्ष निवडणुकीत मनसेची बाजी

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 14:42

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर महानगरपालिकेत नगराध्यक्ष निवडणुकीत मनसे बाजी मारत आपली सत्ता राखली आहे. सर्वाधिक सहा जागा मिळविलेल्या मनसेची पालिकेत सत्ता आहे. नगराध्यक्ष निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. या निवडणुकीत मनसे उमेदवार यशोदा अडसरे यांनी बाजी मारली.

चाळीसगाव उपनगराध्यक्षपदी प्रदीप निकम यांची निवड

Last Updated: Monday, February 25, 2013, 18:54

चाळीसगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप निकम यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज झालेल्या निवडणुकीत प्रदीप निकम यांना सर्व नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला आणि त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नगराध्यक्षाने नगरपरिषदेतील सीसीटीव्हीच चोरले

Last Updated: Monday, December 17, 2012, 17:05

नगराध्यक्षांनेच नगरपरिषदेत चोरी केल्याचा प्रकार पालघरमध्ये घडलाय. पालघरचे नगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्यावर नगरपरिषदेतले सीसीटीव्ही चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. पाटील यांच्यासह पाच नगरसेवकांवर चोरीचा गुन्हा दाखल झालाय.

एक फोन फिरवला... अन् झाली नगराध्यक्षांची निवड

Last Updated: Thursday, November 22, 2012, 20:29

येवला तालुका म्हणजे भुजबळांचा बालेकिल्ला, तालुक्यातील सत्ताकेंद्र भुजबळांच्या ताब्यात आहे. म्हणूनच भुजबळ म्हणतील तोच उमेदवार पदावर असतो. येवल्यामध्ये नुकत्याच नवीन नगराध्यक्षांची निवड झालीय आणि तीही फोनवरून.

मुंडेंची काढणार पुतण्या विकेट

Last Updated: Saturday, December 24, 2011, 14:40

परळीच्या नगराध्यक्षपदावरून भाजपच्या नेत्यांचा नागपुरात काथ्याकुट सुरु असतानाच साता-यात मात्र धनंजय मुंडे यांचे समर्थक क्रिकेट खेळण्यात दंग होते. सातारजवळच्या एका हॉटेलवर या नगरसेवकांचा डेरा आहे.

बदलापुरात शिवसेनेचे वामन म्हात्रे नगराध्यक्ष

Last Updated: Saturday, December 24, 2011, 09:35

ठाणे जिल्ह्यातील कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वामन म्हात्रेंनी बाजी मारली आहे. अपक्ष नगरसेवक आशिष दामले उपनगराध्यक्षपदी निवडून आले आहेत. कुळगाव- बदलापूरमध्ये दोन वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा युती होऊ शकली नव्हती.

घरात मटका अड्डा चालवणाऱ्या नगराध्यक्षाला अटक

Last Updated: Thursday, November 24, 2011, 05:45

नेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षाला मटका अड्डा चालवण्यावरुन अटक करण्यात आलीये. नगाराध्यक्ष पवन जयस्वाल स्वत:;च्या घरात मटका अड्डा चालवत होते. शिवसैनिक असलेले नगराध्यक्ष पवन जयस्वालसब इतर ४ जणांना पोलिसांनी अटक केलीय..