Last Updated: Thursday, February 14, 2013, 13:58
WWW.24taas.com, अलिबागरायगड जिल्ह्यात वाळू माफियांनी पुन्हा धुमाकूळ सुरू केलाय. म्हसळा तालुक्यातल्या आंबेतमध्ये अवैध वाळू उपसा रोखणा-या तहसीलदारांच्या पथकावर हल्ला करण्यात आलाय.
याप्रकरणी तीन वाळू माफियांना अटक करण्यात आली आहे. चार जण मात्र फरार झाले आहेत. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या आधी असचा हल्ला नाशिकमध्ये करण्यात आला होता. तसेच ठाणे जिल्ह्यातली अवैध वाळू उपसा होत आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात अवैध वाळू उपशामुळे बंदी घातली गेली आहे. आता रायगडमध्ये वाळू माफियांची दादागिरी वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे.
First Published: Thursday, February 14, 2013, 13:07