Last Updated: Thursday, June 6, 2013, 11:01
www.24taas.com, झी मीडिया, रायगडरायगडावर आज शिवाजी महाराजांचा ३४० वा राज्यभिषेक दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने गडावर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमासाठी शिवभक्त मोठ्या संख्येने गडावर दाखल झाले आहेत.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिन महोत्सव समिती यांच्यातर्फे या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत होणा-या या सोहळ्यासाठी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे हे देखील उपस्थित राहणार आहेत.
शिवभक्तांच्या स्वागतासाठी गडाच्या मार्गावर स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर जल्लोषात साजरा करण्यात येतो.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, June 6, 2013, 10:34