लोकलमधील स्टंटबाजी बेतली जीवावर! Stunts in local train leads to death

लोकलमधील स्टंटबाजी बेतली जीवावर!

लोकलमधील स्टंटबाजी बेतली जीवावर!
www.24taas.com, झी मीडिया, मु्ंब्रा

स्टंटबाजी करणा-या या १४ वर्षांच्या मुलाला आपला प्राण गमवावा लागलाय. मोहसीन असं या मुलाचं नाव आहे. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबियांना जबरदस्त धक्का बसलाय. मोहसिन मुंब्र्याचा राहणारा आहे. ठाण्याहून मुंब्र्याला परतत असताना स्टंटबाजी करणं त्याच्या जीवावर बेतलंय.

स्टंटबाजीचे असे प्रकार घडू नये यासाठी पालकांनीही लक्ष देण्याची गरज आहे, असं मोहसीनच्या वडिलांनी सांगितलंय. ही चित्रफिती काळजाचा थरकाप उडणारी आहे. अवघ्या दीड मीनिटात १४ वर्षाच्या मोहसीनवर मृत्यूने झडप घातल्याचं या चित्रफितीत स्पष्ट दिसतंय. कोवळ्या वयात त्याने हा जीवघेण स्टंट केला खरा पण त्याची जबर किंमत त्याला मोजावी लागली. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

शुक्रवारी मोहसीन ठाण्याच्या मॉ़लमध्ये खरेदी करण्यासाठी गेला खरा मात्र परत आली त्याच्या मृत्यूची बातमी. ठाण्यातून परतत असतांना लोकल ट्रेनमध्ये मोहसीन ट्रेनच्या दरवाजात लटकत होता. त्यातून त्याला आनंद मिळत होता. आपण काही तरी वेगळ करतो आहोत असं त्याला वाटत होतं. पण पुढे दबा धरुन बसलेल्या मृत्यूने त्याला गाठलचं...मोहसीनच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसलाय..

धावत्या लोकल ट्रेनमध्ये स्टंट करतांना मोहसीनला आपला जीव गमावावा लागलाय...मात्र अशा प्रकारे अपघात होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.. यापूर्वीही अशा घटना घडल्या असून ते रोखण्यात रेल्वे प्रशासनाला यश येत नसल्याचं मोहसीनच्या प्रकरणातून पुन्हा एकदा उघड झालंय..


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, August 13, 2013, 21:15


comments powered by Disqus