सांगलीचा स्टंटबॉय...८ वर्षांचा रत्नजीत

Last Updated: Sunday, February 2, 2014, 19:42

काळजाचा ठोका चुकवणारे स्टंट करणं ही काही फक्त परदेशी तरुणांची मक्तेदारी नाही. कारण आता भारतातही असे स्टंट करणारे अनेक आहेत. मात्र सांगलीतल्या चिमुकल्याला पाहिलं तर तुम्ही तोंडात बोटं घातल्याशिवाय राहणार नाही. मात्र या स्टंटचं अनुकरण करून जीव धोक्यात घालू नका. कारण सांगलीच्या स्टंटबॉयला जमलं ते तुम्हाला जमेलच असं नाही.

रेल्वे रुळांखाली झोपण्याचा जीवघेणा स्टंट!

Last Updated: Thursday, September 26, 2013, 11:34

धावत्या रेल्वेतली स्टंटबाजी आपण आजवर पाहिलीय. पण धावत्या ट्रेनखाली स्टंट करणारी ही दृश्यं हादरवून टाकणारी आहेत. ही मुलं ज्या पद्धतीनं स्टंट करण्यासाठी रेल्वे रूळावर झोपताहेत. लोकल ट्रेन वरून जाईपर्यंत रूळावरच झोपून राहताहेत. हा सगळाच प्रकार अंगावर काटा आणणारा आहे.

मुंबईमध्ये रात्री धूम स्टाईल, स्टंट करणाऱ्यांकडून ४ कोटी वसूल

Last Updated: Saturday, September 21, 2013, 09:19

मुंबईमध्ये रात्री धूम स्टाईल रंगणा-या स्टंट रेसिंगला आळा घालण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. वाहतूक पोलिसांनी मुंबईतल्या तब्बल साडेचार लाखांपेक्षा जास्त बेशिस्त दुचाकीस्वारांवर कारवाई करून वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे.

लोणावळ्यातील स्टंट विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतला

Last Updated: Wednesday, August 28, 2013, 13:12

अती उत्साहाच्या भरात केलेलं साहस इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले आहे. ही घटना लोणावळ्यात घडलेय. त्यांने दोन पुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला आणि तो फसला.

लोकलमधील स्टंटबाजी बेतली जीवावर!

Last Updated: Tuesday, August 13, 2013, 21:15

लोकल ट्रेनमध्ये मोहसीन ट्रेनच्या दरवाजात लटकत होता. त्यातून त्याला आनंद मिळत होता. आपण काही तरी वेगळ करतो आहोत असं त्याला वाटत होतं. पण पुढे दबा धरुन बसलेल्या मृत्यूने त्याला गाठलचं..

३३०० फूट उंचावरून महिलांचा स्टंट

Last Updated: Tuesday, August 13, 2013, 14:24

डरके आगे जित है... या वाक्याची प्रचिती कॅलिफोर्नियातल्या योसमित नॅशनल पार्कमध्ये आलीय... कॅलिफोर्नियातल्या योसमित नॅशनल पार्कच्या पहाडावर जमिनीपासून तब्बल ३३०० फूट उंच पहाडावरून दोरीवर चालण्याचा विक्रम दोन महिलांनी केलाय.

मुंबई लोकलमधील स्टंटबाजी जीवावर

Last Updated: Monday, July 29, 2013, 18:11

रेल्वे लोकलच्या दारात उभं राहून स्टंटबाजी करणा-या एका तरूणाला जबर फटका बसलाय. स्टंटबाजी करताना हा तरूण टिळकनगर स्थानकाजवळ ट्रेनखाली पडला. या अपघातात दुर्दैवाने त्याचा पाय कापावा लागलाय.

ही पहा बाईकवरची जीवघेणी स्टंटस....

Last Updated: Sunday, January 27, 2013, 16:11

लोकांच्या जल्लोषावर विरजण टाकण्याची सवय काही जणांना असते... प्रजासातक दिनी सर्वत्र उत्साहाचं वातावरण असताना, नागपुरात काही अतिउत्साही युवकांनी इतरांना त्रास देण्यातच धन्यता मानली...