Last Updated: Saturday, December 10, 2011, 07:30
झी २४ तास वेब टीम, कल्याण 
आज पहाटे कल्याण मध्ये झालेल्या एका भीषण अपघातात तीन जण ठार झाले. तर पाच जण जखमी झाले. मृतांमध्ये मायलेक आणि एका पंधरा वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. मद्यधुंद कारचालकाच्या चुकीमुळं तिघांना प्राणाला मुकावं लागलं. मद्यधुंद कारचालक मयूरेश चिपळूणकरला पोलिसांनी अटक केली.
तर जखमींमध्ये रिक्षाचालकासह चार मुलींचा समावेश आहे. डोंबिवलीतल्या पिसवली गावातले पवार, जाधव आणि पाटील कुटुंबिय आग्री महोत्सवावरून परतत असताना ही घटना घडली.
First Published: Saturday, December 10, 2011, 07:30