टीएमटीच्या बसनं केला पाण्याचा वांदा - Marathi News 24taas.com

टीएमटीच्या बसनं केला पाण्याचा वांदा

झी २४ तास वेब टीम, ठाणे
ठाणे शहरात टीएमटीच्या बसचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पाण्याच्यापाईपलाईनवर बस धडकल्याने पाईपलाईन फुटली. त्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
 
ठाण्यात टीएमटी बस पाईपलाईनला धडकलीये. घोडबंदरमध्ये ही घटना घडलीये. बसच्या या धडकेनं टीएमसीची ११५८ एमएमची पाईपलाईन फुटली. त्यामुळं लाखो लीटर पाणी वाया गेलंय. ड्रायव्हरचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडलाय.
 
या अपघातामुळे लाखो लीटर पाणी वाया गेल्यानं घोडबंदर तसंच आझादनगरच्या पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

First Published: Monday, November 14, 2011, 05:51


comments powered by Disqus