Last Updated: Wednesday, March 21, 2012, 09:42
www.24taas.com, नवी मुंबई नवी मुंबईत भाडेकपातीच्या विरोधात रिक्षाचालकांनी संप पुकारल्याने रिक्षा चालकांची मुजोरी कायम असल्याचे दिसून आले. परीक्षाच्या काळात संप पुकारून विद्यार्थ्यांना वेठीस धरले. त्यामुळे पालकवर्गाची तारांबळ उडाली.
कालच्या संपामुळे प्रवाशांचे हाल झालेत. विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेला आणि नागरिकांच्या ऐन ऑफिसला जाण्याच्या वेळीच हा संप सुरू झाल्यानं नागरिकांचे आणि विद्यार्थ्यांचे हाल झाले. या संपामध्ये महाराष्ट्र रिक्षा चालक मालक संघटना वगळता सर्व संघटना सहभागी झाल्यात.
नवी मुंबईतल्या जवळापास 95 टक्के रिक्षा या सीएनजीवर चालतात. भाडं मात्र पेट्रोल दराप्रमाणं आकारलं जात होतं. आता सीएनजीप्रमाणे भाडं आकारायला आरटीओनं परवानगी दिलीय. त्यामुळं रिक्षाचं भाडं 15 रुपयांवरुन 11 रुपये करण्यात आलंय. या निर्णयाला रिक्षा चालकांनी विरोध करत संप पुकारला होता.
First Published: Wednesday, March 21, 2012, 09:42