मुंबईत रिक्षाभाडेवाढीची अमंलबजावणी

Last Updated: Friday, April 20, 2012, 12:10

परिवहन विभागाने १९ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून १ रुपयाची रिक्षाभाडेवाढ जाहीर केली होती. या भाडेवाढीची आजपासून अमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत रिक्षाचे किमान भाडे आता १२ रूपये झाले आहे.

रिक्षा संपकऱ्यांविरोधात RTOचा बडगा

Last Updated: Tuesday, April 17, 2012, 21:11

अंधेरी आरटीओनं 198 संपकरी रिक्षा मालकांना कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. मोटार वाहन अधिनियमानुसार रिक्षा चालकांचा हा संप शिक्षेस पात्र असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याच्या भूमिकेवर आरटीओ ठाम आहे.

रिक्षाचालकांचा संप, नागरिकांना कंप

Last Updated: Monday, April 16, 2012, 16:21

रिक्षा भाडेवाढीसाठी ऑटो रिक्षा मेन्स युनियननं पुकारलेल्या बंदमुळे नवी मुंबईतल्या प्रवाशांचे हाल होत आहेत. रिक्षाचालकांच्या बेमुदत संपावरुन शरद रावांनी माघार घेत आज लाक्षणिक संप पुकारला आहे.

रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर अनिवार्य

Last Updated: Friday, April 13, 2012, 19:44

रिक्षांना इलेक्ट्रनिक मीटर बसवावेच लागतील, या निर्णयावर आज सुप्रीम कोर्टानंही शिक्कामोर्तब केलय. याबाबत रिक्षाचालक संघटनांनी केलेली याचिका युप्रीम कोर्टानं फेटाळून लावलीय. तसंच मुंबई हायकोर्टानं दिलेल्या निर्णयावरही कोर्टानं शिक्कामोर्तब केलंय.

रिक्षाचालकांचा पुन्हा संपाचा इशारा

Last Updated: Wednesday, April 4, 2012, 18:05

इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीविरोधात १६ एप्रिलपासून राज्यभरातील रिक्षाचालक संपावर जातील,असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. भाडेवाढ करण्याची रिक्षा संघटनांची मागणी आहे.

रिक्षाचालकांची मुजोरी तर वाढतेच आहे...

Last Updated: Thursday, March 22, 2012, 12:00

नवी मुंबईत भाडेकपातीच्या विरोधात रिक्षाचालकांचा संप तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. आज दुपारी १२ वाजता याबाबत रिक्षा संघटनांची राज्याच्या सचिवांसोबत बैठक होणार आहे.

नवी मुंबईत रिक्षा संपाने विद्यार्थ्यांची कोंडी

Last Updated: Wednesday, March 21, 2012, 09:42

नवी मुंबईत भाडेकपातीच्या विरोधात रिक्षाचालकांनी संप पुकारल्याने रिक्षा चालकांची मुजोरी कायम असल्याचे दिसून आले. परीक्षाच्या काळात संप पुकारून विद्यार्थ्यांना वेठीस धरले. त्यामुळे पालकवर्गाची तारांबळ उडाली.