रायगड, ठाण्यात नद्यांना पूर, Thane, Raigad, Mahad rich in rain

रायगड, ठाण्यात नद्यांना पूर

रायगड, ठाण्यात नद्यांना पूर
www.24taas.com, झी मीडिया, ठाणे, महाड

रायगडमध्ये रात्रीपासून पावसाचा जोर वाढलाय. सावित्री, गांधारी नद्यांना पूर आला असून महाड शहरात पाणी शिरण्यास सुरुवात झालीय. सुकटगल्ली, मच्छिमार्केट, दस्तुरी नाका, गांधारी पुलावर पाणी आलंय.

माळशेज घाटात पुन्हा दरड कोसळली आहे. कालच ८ दिवसांनंतर घाटातून एकेरी वाहतूक सुरू झाली होती. मात्र आज पुन्हा दरड कोसळल्यानं वाहतूक बंद झालीय. या ठिकाणी शनिवार, रविवार कोणीही फिरायला येऊ नका, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

ठाणे जिल्ह्याच्या विक्रमगडमधल्या धामणी धरणांचे पाचही दरवाजे उघडण्यात आल्यानं सूर्या, आणि वैतरणा नदीला पूर आलाय. शिवाय नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठच्या गावांमध्ये पूरसदृश्य परीस्थिती निर्माण झालीय. तर सूर्या नदीवरील मासवण पूल पाण्याखाली गेल्यानं मनोर – पालघर हा मुख्य रस्ता काल दुपारपासून बंद असून जवळपास १० ते १५ गांवाचा पालघर शहरापासून संपर्क तुटलाय.

दरम्यान धामणी धरणं पूर्ण भरलं असून या परिसरात पाउस होत असल्यानं धरणाला कुठलाही धोका होऊ नये म्हणून धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आलेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, August 2, 2013, 12:59


comments powered by Disqus