Last Updated: Thursday, July 25, 2013, 10:10
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई मुंबईकरांची दोन दिवस दाणादाण उडवणाऱ्या पावसानं सध्या तरी उघडीप घेतलीय. पावसानं विश्रांती घेतल्यानं रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकलसेवा सुरळीत आहे. तसंच मुंबईत ट्रॅफिक अगदी तुरळक ठिकाणी दिसतंय.
रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाचा जोर काहीसा ओसरलाय. रत्नागिरी तालुक्यातलं जनजीवन पूर्वपदावर येतंय. मात्र चिपळूण खेड, संगमेश्वर इथली पूरस्थिती कायम आहे. अजूनही पूर परिस्थिती असलेल्या भागात दोन फुटांपर्यंत पाणी आहे. तसंच समुद्र अजूनही खवळलेला आहे. किनाऱ्यावर आजही मोठ्या लाटा धडकत आहेत. यामुळे समुद्र किनारी राहणाऱ्या लोकांमधे भीतीचं वातावरण आहे.
दरम्यान, बुधवारी रत्नागिरी जिल्ह्यातही समुद्रकिनाऱ्यांवरच्या अनेक गांवांत समुद्राचं पाणी शिरल्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली होती. दुपारी दीडच्या सुमारास उसळलेल्या उंच लाटांमुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं. त्यामुळे काही गावांमध्ये रस्त्यांवर पाणी आलं होतं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, July 25, 2013, 10:05