पराभवानंतर काँग्रेसला राष्ट्रवादीने काढला चिमटा , Congress vs NCP

पराभवानंतर काँग्रेसला राष्ट्रवादीने काढला चिमटा

पराभवानंतर काँग्रेसला राष्ट्रवादीने काढला चिमटा
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली आणि छत्तीसगढ या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानीपत झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला मित्र पक्ष काँग्रेसला टोला लगावलाय. काँग्रेसनं आत्मपरीक्षण करावं, असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते तारीक अन्वर यांनी दिला आहे.

निवडणुकांमधून धडा घेत धोरणात्मक सुधारणा करण्याची काँग्रेसला गरज असल्याचं मतही तारीक अन्वर यांनी व्यक्त केलंय. तर जम्मू-काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अबुल्ला यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना टोला लगावलाय. रँलीला गर्दी कमी होणे हा चांगला संकेत नसल्याचं अब्दुल्ला यांनी म्हटलंय.

शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला दिल्लीत सलग चौथा विजय साजरा करता आला नाही. आम आदमी पक्षाच्या रूपाने या पक्षापुढे आव्हान ठेवले आणि काँग्रेसच्या पराभवाला तेच जबाबदार असल्याचे दिसत आहे. आम आदमीने २६ जागांवर विजय मिळवत बाजी मारलेय. तर एका जागेवर आघाडी घेतली आहे. काँग्रेसचे पानीपत झाले असताना राष्ट्रवादीने जोरदार चिमटा काढलाय.

राजस्थानात कॉंग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि भाजप नेत्या वसुंधराराजे यांच्यात वर्चस्वाचा सामना होता. त्यात वसुंधराराजे यांनी बाजी मारली. मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी विकासकामांच्या जोरावर सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याचा मान पटकावलाय. छत्तीसगडमध्येही चावलवाले बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुख्यमंत्री रमणसिंग यांना धक्का बसला आहे. काँग्रेसने याठिकाणी त्यांना जोरदार टक्कर दिल्याचे चित्र आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, December 8, 2013, 19:09


comments powered by Disqus