पोलीस मारहाण : राम कदमांची मनसेकडून निंदा, MSN condemned the Ram Kadam

पोलीस मारहाण : राम कदमांची मनसेकडून निंदा

पोलीस मारहाण : राम कदमांची मनसेकडून निंदा
www.24taas.com,मुंबई

आमदार मारहाणी प्रकरणात मनसे आमदार राम कदम यांच्यावरही आरोप करण्यात आला आहे. या मारहाण घटनेची मनसे गटनेते बाळा नांदगावकर यांनी निंदा केली आहे.

मनसे आमदार राम कदम यांना मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी नोटीसही बजावली आहे. मनसे कार्यालयात येऊन स्पष्टीकरण द्यावे, यासाठी कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. पोलीस मारहाणीमध्ये मनसे आमदार असल्याने मनसेही अडचणीत सापडली आहे. आता राम कदम यांच्यावर मनसे काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.

राम कदम हे मनसेच्या सातव्या वर्धापन दिन कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्याबाबत मनसेतून नाराजी होती. त्यातच राम कुठेही दिसत नाही, अशी विचारणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. आता ऑनड्युटी पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी मनसेचे नाव राम कदमांमुळे आल्याने आमदार कदम यांच्यावर कारवाई होणार, याचे स्पष्ट संकेत मनसेकडून मिळाले आहेत.

First Published: Tuesday, March 19, 2013, 16:26


comments powered by Disqus