सेनाचा अविश्वास ठराव, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार, Winter session In Nagpur,

सेनाचा अविश्वास ठराव, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

सेनाचा अविश्वास ठराव, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
www.24taas.com, नागपूर

राज्याचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. नागपूर अधिवेशनच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, सरकारच्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला. दरम्यान, सरकराविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्धार शिवसेने केला आहे.

विरोधकांनी सरकारला उत्तर देण्यासाठी सिंचन प्रश्नावर मोठी व्युहरचाना केली आहे. सिंचन श्वेतपत्रिकेला विरोधक काळ्या पत्रिका काढून उत्तर देणार आहेत. दरम्यान, शिवसेनेने सरकारविरोधात अविश्वास ठराव आणणार आहे. त्यामुळे सरकारला कोंडीत पकडण्याची संधी विरोधकांनी साधली आहे. याला सरकार कसे उत्तर देते याकडे लक्ष लागले आहे.

सिंचनाच्या पाण्यावरून हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित चव्हाण यांना टार्गेट करण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. बाबा-दादा यांना धारेवर धरण्याची व्युहरचना केली आहे. त्यासाठी सिंचन घोटाळाचा प्रश्न उचलून धरण्यात येणार आहे. तसा इशारा विरोधकांनी आधीच दिला आहे.

सिंचनाच्या श्वेतपत्रिकेत अजित पवार यांना क्लीन चीट म्हणजे राज्य सरकारने त्यांना अटक पूर्व जामीन दिल्याची टीका भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी नागपुरात केली आहे. सोमवारपासून सुरु होणारं हिवाळी अधिवेशन वादळी होण्याची व्यवस्था मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अगोदरच केल्याचा टोमणाही त्यांनी लगावला. अजितदादांचा राजीनामा ही नौटंकी असून त्याची स्क्रिप्ट दादांनीच लिहिल्याची टीका भाजपचे प्रदेश महासचिव देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.

First Published: Sunday, December 9, 2012, 15:13


comments powered by Disqus