‘कावासाकी’ सुस्साट... ‘१००० सीसी’च्या दोन बाईक लॉन्च!, `Kawasaki` sussata ... 1000 CC `s launch two

‘कावासाकी’ सुस्साट... ‘१००० सीसी’च्या दोन बाईक लॉन्च!

‘कावासाकी’ सुस्साट... ‘१००० सीसी’च्या दोन बाईक लॉन्च!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

कावासाकी, बाईक, लॉन्च, झेड १०००, निंजा-१०००

जपानची टू-व्हिलर कंपनी ‘कावासाकी’नं भारतात दोन नव्याकोऱ्या बाईक ‘झेड-१०००’ आणि ‘निंजा-१०००’ लॉन्च केल्या आहेत. या दोन्ही बाइकची दिल्लीतील एक्स शोरुम किंमत १२ लाख १२ हजार रुपये इतकी आहे. कंपनीनं ‘निंजा झेड एक्स-१४ आर’ आणि ‘झेड एक्स-१० आर’सहीत प्रीमियम मोटारसायकलच्या चार मॉडेलचा समावेश करुन भारतात दरवर्षी आर सिरीजच्या २५० बाइक्स विकण्याचा निर्धार केलाय.

या व्यतिरिक्त कावासाकी कंपनी ही भारतात ‘अॅडव्हेंचर’सारख्या क्रूज बाईक्स आणण्याच्या योजनेवर काम करत आहे. इंडिया कावासाकी मोटर्सचे उपप्रतिनिधी संचालक निस्कीकावा शिजेतो यांनी फोनद्वारे सांगितले की, ‘या दोन बाइक्स लॉन्च केल्यानंतर प्रीमियम सेगमेंटमध्ये आमच्याकडे चार मॉडल निर्माण झाले आहेत...भारतात दरवर्षी कमीतकमी २५० यूनिट्स विकले जातील अशी आम्हाला आशा आहे’.

‘कावासाकी झेड-१०००’ आणि ‘निंजा-१०००’ या दोन्ही बाइक्समध्ये १,०४३ सीसी पॉवरचे इंजिन वापरण्यात आलंय. जपानमधून या बाइक भारतात आयात करून पुणे आणि दिल्लीस्थित शोरुमद्वारे या बाईक्सची विक्री करण्यात येईल.
या बाइकची प्रमुख वैशिष्ट्ये :
झेड - Z १००० आणि निंजा – १००० :


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, December 26, 2013, 20:38


comments powered by Disqus