Last Updated: Tuesday, January 31, 2012, 11:45
www.24taas.com,राळेगण राळेगणसिद्धीचे सरपंच जयसिंग मापारींनी माघार घेतलीय अंतर्गत वादामुळे त्यांनी माघार घेतलीय. मापारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार होते. मात्र तालुक्यातल्या काही जणांचा मापारींच्या उमेदवारीला विरोध होता. त्यातूनच मापारींनी माघार घेतलीय.
राळेगण सिद्धीचे सरपंच जयसिंग मापारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी मापारींना राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्यास परवानगीही दिली होती. अहमदनगर जिल्ह्यातील वाडेगव्हाण जिल्हा परिषद गटातून मापारींनी उमेदवारी मागितली होती.
First Published: Tuesday, January 31, 2012, 11:45