प्रेम कहाणीला सुरुवात...
भारतीय प्रशासकीय परीक्षेच्या अभ्यास करताना अरविंद केजरीवाल आणि सुनीता यांच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली. भारतीय प्रशासकीय परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अरविंद आणि सुनीता नागपूर येथील राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीमध्ये (आयआरएस) दाखल झाले. तेथे दोघांची भेट झाली आणि या भेटीचे रूपांतर प्रेमात अधिक घट्ट झाले. स्पष्टवादी आणि प्रामाणिक या स्वभावामुळे अरविंद, सुनीता यांना भावलेत.
सुनीता या दिल्लीच्या तर अरविंद केजरीवाल हे हरियाणामधील हिसार शहरातील राहणारे. नोव्हेंबर १९९४ मध्ये दोघांचा विवाह झाला. १९९५मध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते दिल्लीत स्थायिक झालेत. त्यांना वर्षभरात हर्षिता हे कन्यारत्न झाले. तर २००१मध्ये मुलगा पुलकितचा जन्म झाला.
आयआरएसची नोकरी सोडून केजरीवाल यांनी समाजसेवचे व्रत स्वीकारले. देशसेवा करण्यासाठी ते प्रेरीत झालेत. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याबरोबर आंदोलनात उडी घेतली. त्यानंतर त्यांनी फारकत घेत स्वतंत्र आम आदमी पक्ष स्थापन केला. सहा महिन्यातच त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली. आणि त्यांच्या पक्षाने २८ जागा जिंकूण सत्ताही मिळवली. ते दिल्लीचे ७ वे मुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली.
यशात पत्नीचा वाटा...
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. अरविंद केजरीवाल यांच्या यशातही त्यांची पत्नी सुनीता यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांची प्रथम भेट आयआयटी खरगपूर येथे झाली. तेव्हा केजरीवाल आयआयटी खरगपूर येथे शिक्षण घेत होते. आज मुख्यमंत्री असलेले अरविंद यांच्यासोबत सुनीता यांनी देखील अनेक कठीण प्रसंग पाहिले आहेत. मुख्यमंत्री अलेले अरविंद याआधी इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये (आयआरएस) सहआयुक्त होते. २००६ मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला.
त्यांची पत्नी सुनीता या देखील आयआरएस आहेत. सध्या त्या दिल्लीमध्ये सहायक संचालक पदावर कार्यरत आहेत. त्यांची सध्याची कमाई अरविंद यांच्यापेक्षा जास्त आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर केजरीवाल यांनी लाल दिव्याच्या गाडीला नकार दिलाय. तर त्यांची पत्नी आजही लाल दिव्यच्या गाडीतून कार्यालयात जातात.
स्वप्नवत मुख्यमंत्रीपद
२००६मध्ये आयआरएसची नोकरी सोडून केजरीवाल यांनी समाजसेवचे व्रत स्वीकारले. देशसेवा करण्यासाठी ते प्रेरीत झालेत. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याबरोबर आंदोलनात उडी घेतली. त्यानंतर त्यांनी फारकत घेत स्वतंत्र आम आदमी पक्ष स्थापन केला. सहा महिन्यातच आप आणि त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली. आणि त्यांच्या पक्षाने २८ जागा जिंकूण सत्ताही मिळवली.
मिळालेले यश आमचे नाही ते आम आदमीचे आहे,असू सांगून दीड कोटी जनतेचा विजय असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी झाडू चिन्ह घेऊन निवडणूक लढविली. मला राजकारणातील चिखल साफ करायचा असे सांगत त्यांनी राजकारणात शिरकाव केला. त्यात ते यशस्वी झालेत. त्यांना २८ जागा मिळाल्यानंतर भाजपने ३२ जागा मिळवूनही सत्ता स्थापन करण्यास नकार दिला. त्यानंतर काँग्रेसच्या पाठिंब्याने सत्ता स्थापनेचा निर्णय घेतला. मला मिळालेले पद हे स्वप्नवत आहे, असे केजरीवाल यांनी म्हटलेट. त्यांनी दिल्लीचे ७ वे मुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली.
आम आदमी नेता
भ्रष्टाचार आंदोलनाच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल लोकांमध्ये लोकप्रिय झालेत. त्यांनी विजेचे आंदोलन करताना वीजजोडणी तोडून लोकांचा पाठिंबा मिळवला. त्यातच भ्रष्टाचारावर राळ उठवून दिल्लीत आपला संघर्ष लढा सुरू ठेवला आणि ते अल्पावधीच आम आदमी नेते झालेत.
केजरीवाल यांनी उमेदवारी दाखल करताना सादर केलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे ९३ लाख रुपयांची संपत्ती आहे आणि २३,५५० रुपये वीज बिलाची थकबाकी आहे. त्यासोबतच त्यांनी जाहीर केले होते, की त्यांच्याकडे रोख आणि बँकेतील ठेव मिळून १.६6 लाख रुपये आहेत. उत्तरप्रदेशमधील गाझीयाबाद जिल्ह्यातील इंद्रापूरम येथे जागा आणि हरियाणामधील करनाल जिल्ह्यातील शिवानी गावात वडिलोपार्जित शेत जमीन आहे.
अरविंद यांच्याकडे रोख पाच हजार रुपये आहेत. त्यांचे दोन बँक अकाउंट्स आहेत. त्यातील एक एसबीआय तर दुसरे आयसीआयसीआय मध्ये आहे. त्यांच्या एसबीआयमधील खात्यात १ लाख ५६ हजार ८६३रुपये आहेत, तर दुसऱ्या खात्यात एक हजार रुपये आहेत.
कुटुंबवत्सल...
अरविंद केजरीवाल कुटुंबवत्सल आहेत. ते नेहमी आपल्या कुटुंबाला प्राधान्य देताना समाजसेवा करीत आहेत. मात्र, असे असले तरी अरविंद यांच्यापेक्षा त्यांची श्रीमंत असल्याचे आकडेवाडीवरून स्पष्ट होत आहे.
सुनीता केजरीवाल यांच्याकडील रोख रक्कम अरविंद यांच्याकडील रकमेपेक्षा दुप्पट आहे. जिथे अरविंद यांच्याकडे रोख पाच हजार रुपये आहेत तर, त्यांच्या पत्नीकेड १० हजार रुपये रोख आहेत. बँक खात्याची तुलना केली तर सुनीता यांच्या एसबीआयमधील खात्यात १ लाख रुपये ७ हजार ९९४ रुपये आहेत.
केजरीवाल यांचे २०१२-२०१३ या आर्थिक वर्षातील उत्पन्न २.०५ लाख रुपये होते. तर त्यांच्या पत्नीचे उत्पन्न ९.८ लाख रुपये होते.
सुनीता यांच्या नावे गुडगाव येथे एक कोटी रुपयांचा फ्लॅट आणि १६.८ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांच्यावर ३० लाख रुपयाचे गृहकर्ज आणि नातेवाईकांकडून ११ लाख रुपये उसणे देणे आहे.
/marathi/slideshow/कोण-होते-अरविंद-केजरीवाल_296.html/6