परदेशातील पिचवर चांगली बॅटिंग
राहुल द्रविडने भारतापेक्षा परदेशातील पिचवर चांगली बॅटिंग केली आहे. त्याच्या सरासरी धावसंख्येचं प्रमाण 53.03 आहे. राहुल द्रविडने सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या एवढ्या प्रमाणात परदेशी दौर केले आहेत.
कुणाशीही वाद झाल्याचं अजून ऐकिवात नाही
राहुल द्रविडचा टीममध्ये तसेच टीम बाहेर कुणाशीही वाद झाल्याचं अजून ऐकिवात नाही. यामुळे टीममधील वातावरण आणखी फ्रेंडली होईल, अशी अनेकांना आशा आहे.
नेट प्रॅक्टीस सुरू असतांना तो सर्वात आधी मैदानात हजर राहत असे, ही एका सिनिअरसाठी नक्कीच महत्वाची गोष्ट आहे.
सर्वात विशेष म्हणजे सौरव गांगुली कर्णधार असतांना टीम इंडियाचा राहुल द्रविड हा सदस्य होता, तेव्हा त्याने अनेक शानदार विजय मिळवले आहेत.
तेव्हा टीमचे कोच न्यूझीलंडचे माजी कर्णधार जॉन राईट होते. एक कर्णधार म्हणूनही राहुल द्रविडचं करिअर खूप चांगलं राहिलं आहे.
यावरूनच राहुल द्रविड यांची पत्नी विजेता राहुलला परफेक्ट मानते. राहुल द्रविड शिवाय टीम इंडियात आणखी कोण टीम इंडियाचा कोच होऊ शकतो, तर कुणीही नाही असंच उत्तर येईल.
द्रविडने नेहमीच डिफेंसिव बॅटिंग केली
राहुल द्रविडने नेहमीच डिफेंसिव बॅटिंग केली आहे. आपल्या खेळाच्या तंत्रज्ञानाच्या जोरावर राहुल द्रविडने अनेक वेळा टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे.
राजस्थान रॉयल्स विरोधात खेळतांना राहुल द्रविडने आपल्या इमेजच्या विरोधात आक्रमक बॅटिंगही करून दाखवली.
राहुल द्रविडने संजू सॅमसन सारखा खेळाडू शोधून काढला
राजस्थान रॉयल्समध्ये राहुल द्रविडने संजू सॅमसन सारखा खेळाडू शोधून काढला, संजूला राहुलने नेहमीच वरच्या क्रमात खेळण्याची संधी दिली आणि संजूनेही राहुल द्रविडने निवडलेलं सोनं खरखुरं असल्याचं, आपल्या खेळातून दाखवून दिलं.
जगभरातील क्रिकेटर सन्मान देतात
राहुल द्रविडचं नाव जगातील काही निवडक क्रिकेटपटूंमध्ये घेतलं जातं. राहुल द्रविडला त्याचे मित्र आणि जगभरातील क्रिकेटर सन्मान देतात.
राहुल द्रविड कर्णधार असतांना, राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंचं नाव आयपीएल फिक्सिंगमध्ये आलं. मात्र राहुल द्रविडचा या प्रकणात दूर दूर पर्यंत संबंध नव्हता.
फिक्सिंग नंतर राहुल द्रविडने म्हटलं होतं, माझ्या खेळाडूंनी मला धोका दिला, माझं या घटनेशी काही घेणं देणं नाही.
/marathi/slideshow/टीम-इंडियासाठी-परफेक्ट-कोच-का-आहे-राहुल-द्रविड_312.html/6