राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत परप्रांतीय फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. तसेच भारत-पाक संबंधांवर त्यांनी कडवट टीका केली.
राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे
- केंद्रातील सरकार आणि भाजपचा चर्चेचा खेळ सुरू आहे. समझोता एक्सप्रेस कोणी सुरू केली – राज
- सीमेवर पाकचा धिंगाणा चालला असताना क्रिकेट सामने आणि अमन की आशा हे कार्यक्रम कशासाठी ? – राज
- जे जवान शहीत होत आहेत, त्यांच्यासाठी भविष्यात काय सरकार करते – राज
- सीमेवरील जवानांचा खेळ चाललाय. दोन दिवस सहानभुती दाखवायची, हेच सरकारचे धोरण आहे – राज
- यापुढे काही घडले तर पाकिस्तानला उत्तर देऊ असे सांगणारे सिंग आधी घडलंय त्याकडे बघा -राज ठाकरे
- लष्करप्रमुख विक्रम सिंग यांच्यावर राज ठाकरे यांनी घेतले तोंडसुख
- भारत-पाक मुद्द्याचे राजकारण केलं जात आहे. दुसऱ्या विषयाकडे लक्ष वळविले जात आहे - राज ठाकरे
- बांग्लादेशी लोक झोपड्यात राहत आहेत. त्यांच्या झोपड्या जाळून त्यांना पक्की घरे दिली जातात –राज
- अनधिकृत रिक्षा-टॅक्सींवर कारवाई होत नाही, सरकार निष्काळजी आहे - राज ठाकरे
- मुंबईत अनधिकृत रिक्षा-टॅक्सी फिरत आहेत – राज
- फेरीवाल्यांबाबत राष्ट्रपतींकडे प्रस्ताव कशाला? काय चालंलय नक्की - राज ठाकरे
- राज्यातील शहरांवर मराठी माणसांचा पहिला हक्क – राज
- ढोबळेंवर कारवाई मात्र, परप्रांतीय फेरीवाल्यांवर कारवाई का नाही - राज ठाकरे
- माझ्या हातात सत्ता द्या, कायद्याचे राज्य कसे असते दाखवून देतो - राज ठाकरे
- परप्रांतीय फेरीवाल्यांना राज ठाकरे यांनी दिलाय दम
- मराठी फेरीवाल्यांच्या जागा अमराठी फेरीवाले बळकावत आहेत – राज
- फेरीवाल्यांनी मोर्चा काढला तर मनसे रस्त्यावर उतरेल, हे लक्षात ठेवा - राज ठाकरे
- मतांचा टक्का वाढविण्यासाठी सर्व राजकारण सुरू आहे – राज
- मोर्चा काढलात तर त्याच दिवसापासून मनसे फुटपाथवर काय करते ते पाहा - राज ठाकरे
- पोलिसांविरोधात, महापालिकेविरोधा मोर्चो काढून दाखवाच – राज
- फेरीवाल्यांनी मोर्चा काढून ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला तर ते खपवून घेणार नाही – राज
- राष्ट्रवादीची ढोंगबाजी सुरू आहे – राज
- गृहमंत्री राष्ट्रवादीचे असताना मुख्यमंत्री ढोबळेंची बदली करू शकतात? - राज ठाकरे
- सिंचन श्वेतपत्रिका मुख्यमंत्र्यांनी काढण्यास सुरूवात केली तेव्हा राष्ट्रवादीचे मंत्री कसे देतात – राज
- ढोबळे यांची बदली मुख्यमंत्र्यांनी केली हे आर आर सांगतात हे केवळ नाटक आहे - राज ठाकरे
- पोलिसांचे खच्चीकरण करण्याचे काम सुरू आहे – राज
- सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांची बदलीमागे पोलिसांचे खच्चीकर सुरू – राज
- कोकणातही सभा घेणार – राज
- सोलापूर-जालन्यातही घेणार सभा – राज
- १२ तारखेला कोल्हापुरात सभा
- ११ तारखेला सांगलीत घेणार सभा - राज ठाकरे
- साताऱ्यापासून दौऱ्याला सुरूवात – राज
- राज ठाकरे १० फेब्रुवारीपासून महाराष्ट्र दौऱ्यावर
- राज ठाकरे आगामी महाराष्ट्र दौरा करणार
www.24taas.com, मुंबई
येत्या फेब्रवारीपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात १० सभा घेणार असून त्यासाठी भरपूर मटेरिअल माझ्याकडे आहे. आपल्या देशात मटेरिअलची कमतरता नसते. दररोज कोणाला तरी फटकावता येईल असे मटेरिअल कायम तयार असते, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केले.
प्रवीण दरेकरांच्या मतदारसंघातील विकास कामांच्या उदघाटन सोहळा राज ठाकरेंच्या उपस्थितीत कांदिवलीमध्ये झाला. त्यावेळी ते बोलत होते. आपल्या २ ते ३ मिनिटांच्या भाषणात त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून बोललो नाही. काही दिवसांपूर्वी थोडीशी झलक दाखवली होती. आता फेब्रवारीपासून माझा महाराष्ट्राचा दौरा होणार आहे. या दौऱ्याची पहिली सभा कोल्हापूरमध्ये होणार आहे. यावेळी, अनेकांचा समाचार घेणार असल्याचा संकेत त्यांनी यावेळी दिले.
महाराष्ट्राच्या दौऱ्यात किमान १० सभा घेणार आहे. त्यासाठी माझ्याकडे भरपूर मटेरिअल आहे. आपल्या देशात मटेरिअलची कमतरता नसते. दररोज कोणाला तरी फटकवता येईल, एवढे मटेरिअल आपल्याकडे दररोज तयार होते. त्यामुळे या दौऱ्यात फटकेबाजी तुम्हांला पाहायला मिळणार असल्याचेही संकेत त्यांनी यावेळी दिले. या दौऱ्यामध्ये मी मत मागायला जाणार नाही, तर माझं मत मांडायला जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
www.24taas.com, मुंबई
`केंद्रातील सरकार आणि भाजपचा चर्चेचा खेळ सुरू आहे. समझोता एक्सप्रेस कोणी सुरू केली?` असा खडा सवाल करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारत-पाकिस्तान प्रश्नावर जोरदार टीका केली. `सीमेवर पाकचा धिंगाणा चालला असताना क्रिकेट सामने आणि अमन की आशा हे कार्यक्रम कशासाठी? असाही सवाल राज ठाकरेंनी केला.`
`जे जवान शहीद होत आहेत, त्यांच्यासाठी भविष्यात काय सरकार करते, सीमेवरील जवानांचा खेळ चाललाय. दोन दिवस सहानभुती दाखवायची, हेच सरकारचे धोरण आहे.` यापुढे काही घडले तर पाकिस्तानला उत्तर देऊ असे सांगणारे सिंग आधी घडलंय त्याकडे बघा, असं म्हणतं राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. तसेच लष्करप्रमुख विक्रम सिंग यांच्यावर राज ठाकरे यांनी तोंडसुख घेतले आहे.
हॉकी क्रिकेट सुरू रहाते आणि जवानांचा बळी जातो, सरकार का ठोस भूमिका घेत नाही? रालोआ सरकारच्या काळात सुरू केलेल्या समझोता एक्स्प्रेस आणि बसगाड्यांवरही त्यांनी टीका केली. कोणी या गाड्या सुरू करायला सांगितल्या होत्या?
www.24taas.com, मुंबई
महाराष्ट्रातील शहरांवर पहिला अधिकार हा मराठी माणसाचा आहे. परप्रांतीय फेरीवाले जर आझाद मैदानावर आपली ताकद दाखविणार असतील तर दुसऱ्या दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना फूटपाथवर आपली ताकद दाखवेल, असा सज्ज दम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिदेत दिला.
राज ठाकरे यांनी गेल्या चार महिन्यांपासून कोणतेही वक्तव्य केले नव्हते. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेवर सर्वांचे लक्ष लागून होते. यावेळी त्यांनी ढोबळेंच्या बदलीचा मुद्दा पुढे करून परप्रांतीय फेरीवाल्यांवर हल्ला बोल केला. ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून पोलिसांचे मनोधैर्य खच्चीकरणाचे प्रकार सुरू आहे. कोणत्याही फेरीवाल्यावर कारवाई केली तर बदली होते, मग कोणता पोलिस अधिकारी फेरीवाल्यावर कारवाई करेल, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
यावेळी त्यांनी अजित पवार यांच्याही चांगलाच समाचार घेतला. ढोबळे यांची बदली आम्हांला मान्य नाही पण हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकारात घेतला आहे. सिंचनाची श्वेतपत्रिकाही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकाराने काढण्याचे आदेश दिले होते. तेव्हा का विरोध केला. तेव्हा का मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचा आदर केला नाही. आता या बाबतीत कुठलं राजकारण खेळलं जातयं, असा सवालही राज ठाकरे यांनी केला.
फेरीवाल्यांनी मोर्चा काढून ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला तर ते खपवून घेणार नाही. पोलिसांविरोधात, महापालिकेविरोधा मोर्चो काढून दाखवाच, त्याच दिवसापासून मनसे फुटपाथवर काय करते ते पाहा, मतांचा टक्का वाढविण्यासाठी सर्व राजकारण सुरू असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला. मराठी फेरीवाल्यांच्या जागा अमराठी फेरीवाले बळकावत आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक शहरावर पहिला अधिकार हा मराठी माणसाचा आहे. त्यामुळे मराठी फेरीवाल्यांना माझा विरोध नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक शहराच्या दोन टक्के हा फेरीवाल्यांसाठी ठेवायला हवा, यासाठी राष्ट्रपतींकडे प्रस्ताव गेला आहे. हा प्रस्ताव कशाला? काय चालंलय नक्की. मुंबईची लोकसंख्या १ कोटीच्या वर कधीच गेली आहे. त्यात दोन टक्के फेरीवाले मग रस्त्यावरील फुटपाथ या फेरीवाल्यांनीच भरणार? माणसांनी चालायचं कुठे... असे म्हणत राज ठाकरेंनी तोफ डागली.
www.24taas.com, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. त्यांच्या दौऱ्यात ते प्रत्येक ठिकाणी सभा घेणार आहेत. त्यामुळे त्यांच्या सभेतून ते कोणावर तोफ डागणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. राज ठाकरे यांचा दौरा नक्की कसा असणार, त्यांच्या सभा कुठे-कुठे होणार याची माहिती पुढीलप्रमाणे देण्यात आला आहे.
१२.२.२०१३ - कोल्हापूर येथे संध्या. ६.३० वा. जाहीर सभा
१५.२.२०१३ - खेड येथे संध्या. ६.३० वा. जाहीर सभा
२२.२.२०१३ - सोलापूर येथे संध्या. ६.३० वा. जाहीर सभा
२६.२.२०१३ - परभणी येथे संध्या. ६.३० वा. जाहीर सभा
२.३.२०१३ - जालना येथे संध्या. ६.३० वा. जाहीर सभा
१५.३.२०१३ - नागपूर येथे संध्या. ६.३० वा. जाहीर सभा
२४.३.२०१३ - अमरावती येथे संध्या. ६.३० वा. जाहीर सभा
७.४.२०१३ - जळगाव येथे संध्या. ६.३० वा. जाहीर सभा
www.24taas.com, पटना
राज ठाकरे यांनी कालच्या पत्रकार परिषदेत सीमेवरील सैनिकांचा मुद्दा उचलून धरला होता. सैनिकांचा वापर भारत-पाकमधल्या राजकारणासाठी केला जात असल्याचा आरोप करत राज यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना बिहारचे भाजप नेते गिरीराज सिंग यांनी राज यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत.
राज यांनी प्रथमच देशाच्या प्रश्नांवर भाष्य केल्याचं सांगत त्यांनी राज यांची प्रशंसा केली आहे. एखाद्या बिहारी नेत्यानं राज यांची स्तुती करण्याची ही पहिलीच वेळ आहे... त्यामुळे आता राज ठाकरे यांनी देशाबाबत वक्तव्य केल्याने त्यांच्याबाबत देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
जे जवान शहीद होत आहेत, त्यांच्यासाठी भविष्यात काय सरकार करते, सीमेवरील जवानांचा खेळ चाललाय. दोन दिवस सहानभुती दाखवायची, हेच सरकारचे धोरण आहे.` यापुढे काही घडले तर पाकिस्तानला उत्तर देऊ असे सांगणारे सिंग आधी घडलंय त्याकडे बघा, असं म्हणतं राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. तसेच लष्करप्रमुख विक्रम सिंग यांच्यावर राज ठाकरे यांनी तोंडसुख घेतले आहे.
www.24taas.com, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे लवकरच महाराष्ट्राचा प्रदीर्घ दौरा करणार आहेत. राज ठाकरे हे कोल्हापूरपासून आपल्या दौऱ्याला सुरवात करणार आहेत. महालक्ष्मीचे दर्शन घेऊन राज ठाकरे आपला दौरा सुरू करणार आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर राज यांचा झंझावात मनसैनिकांना अनुभवता येणार आहे.
राज्यातील त्यांचा हा दौरा प्रदीर्घ असून कोल्हापुरातून सुरू होऊन कोल्हापूरमध्येच पहिली सभा घेणार आहेत. ५ फेब्रुवारी ते ९ मार्च असा दौऱ्याचा कालावधी असणार आहे. नुकताच उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दौरा केला होता. मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा फेब्रुवारी ते मार्च असा तब्बल एक महिन्याचा असणार आहे.
विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माणे सेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुंबई, नाशिक, पुणे दौर्यानंतर ते मराठवाडा आणि विदर्भाचा दौरा करणार आहेत. तत्पूर्वी मनसेचे आमदार आणि पक्षाचे सरचिटणीस राज्याच्या विविध जिल्ह्यांना भेटी देणार आहेत. या दौर्यात स्थानिक पदाधिकार्यांशी चर्चा करण्यात येणार आहे.
www.24taas.com, मुंबई
मनसे वाहतूक सेनेची सर्व पदे बरखास्त करण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतला आहे. वाहतूक सेनेबाबत अनेक तक्रारींनतर सर्व पदे बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर तसचं काहीदिवसापूर्वी राज ठाकरे यांनी रस्ते आणि आस्थापना सेनेच्या पदाधिकाऱ्यांनाही बरखास्त करून टाकलं होतं. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर ही सारी पदे बरखास्त करण्यात आली आहे.
तर आज वाहतूक सेनेचीही सारी पदे बरखास्त करण्यात आली होती. परस्पर होणाऱ्या नेमणुका यांच्या वाढत्या तक्रारी राज ठाकरेंपर्यंत गेल्यानेच त्यांनी ही सारी पदे बरखास्त केली आहेत.
याआधीही राज ठाकरेंनी शब्दांत पदाधिकाऱ्यांना सुनावलं होतं. जर कोणी जुन्या पदांचा गैरवापर केल्यास त्याच्यावर पक्षांतर्गत कडक कारवाई करण्यात येईल असा सज्जड दमही भरण्यात आला होता. तसंच यापुढे अन्य संलग्न संस्थांमध्ये परस्पर नेमणुका होऊ नयेत, असे आदेशही देण्यात होते.
www.24taas.com, मुंबई
दिल्ली गँगरेप प्रकरणातील आरोपी हे बिहारीच, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतियांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. आज राज ठाकरेंनी पुन्हा परप्रातियांचा मुद्दा घेऊन बिहारींवर निशाणा साधला. राज ठाकरे बोलला की, केसेस टाकायचे अटक करायचे, पण बलात्कार करणारे होते कोण बिहारीच ना? तर कोकणातील हजारो एकर जमिनी परप्रातियांच्या ताब्यात गेल्याचेही त्यांनी सांगितले.
ग्लोबल कोकण महोत्सवाला राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी पुन्हा परप्रांतीय विरोधी सूर आळवला. दिल्ली गॅंगरेप प्रकरणातील आरोपी बिहारीच असल्याचं राज यांनी म्हटलं. कोकणातील जमिनी परप्रांतीयांना विकण्याच्या थांबवल्या तर कोकणचा विकास होईल. बलस्थानं गमावून बसलो तर विकास कसा होईल, असा सवालही त्यांनी केला. ‘मुंबईत उत्तरप्रदेश विद्यापीठ, युपी भवन याची मागणी केली जाते आणि मग मी बोललो की लगेच काय तर प्रांतीय का?’’अशाच जमिनी कृपाशंकर सिंग यांने कोकणात घेऊन ठेवल्या आहेत, ‘कोकणात दिसली जमीन की, घेतली सिंगाने,’
‘त्या मुलीबाबत सहानभुती आहे वाईटपण वाटतं, पण खोलात न जाता फक्त बलात्कार, बलात्कार अशी ओरड होते, पण करणारे होते कोण? राज ठाकरे बोलला की, केसेस टाकायचे अटक करायचे, पण बलात्कार करणारे होते कोण बिहारीच शीला दिक्षीत पण काय म्हणाल्या ही बजबजपुरी माजली का आहे? ह्या परप्रांतियांमुळेच आणि मी याबाबत बोललो की, देश तोडतो मग यावर कोणत्याही पक्षाने बोलायचे नाही, आणि मी बोललो की, लगेच TRP का?’
www.24taas.com, मुंबई
जवळजवळ चार महिन्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ पुन्हा एकदा धडाडली आहे. काय म्हणाले राज ठाकरे पहा.
आणि मग मी बोललो की लगेच काय तर प्रांतीय का? - राज
मुंबईत उत्तरप्रदेश विद्यापीठ, युपी भवन याची मागणी केली जाते - राज
अशाच जमिनी कृपाशंकर सिंग यांने कोकणात घेऊन ठेवल्या आहेत. - राज
कोकणात दिसली जमीन की, घेतली सिंगाने - राज
आपल्याकडे एक म्हण आहे, आला अंगावर की, घेतला शिंगावर - राज
मग यावर कोणत्याही पक्षाने बोलायचे नाही, आणि मी बोललो की, लगेच TRP का? - राज
आणि मी याबाबत बोललो की, देश तोडतो - राज
शीला दिक्षीत पण काय म्हणाल्या ही बजबजपुरी माजली का आहे? ह्या परप्रांतियांमुळेच - राज
राज ठाकरे बोलला की, केसेस टाकायचे अटक करायचे, पण बलात्कार करणारे होते कोण बिहारीच - राज
पण खोलात न जाता फक्त बलात्कार, बलात्कार अशी ओरड होते, पण करणारे होते कोण? - राज
त्या मुलीबाबत सहानभुती आहे वाईटपण वाटतं - राज
माझा दौरा लवकरच कोकणापासून सुरू होईल - राज
कोकणचा विकास हवा असल्यास भाई जगताप यांनी मनसेत यावं - राज
राज ठाकरे यांचा आमदार भाई जगताप यांना मिश्किल चिमटा
बाहेरून येणारी माणसे कोकणात घुसताहेत, तुमचे अस्तित्व हरवून बसाल - राज
यावर सर्व पक्ष गप्प त्याबद्दल कोणी बोलणार नाही - राज
मुळ गोष्टीला बगल देऊन फक्त बलात्काराबद्दल सांगायचे, करणारे कोण होते?बिहारीच होते - राज
मुलींबद्दल सहानभुती, पण कोणी खोलात जात नाही - राज
मला सत्ता मग दाखवतो ग्लोबल कोकण - राज
सर्व गोष्टी आधी महाराष्ट्रीयांच्या मग बाकीच्यांचा - राज
महाराष्ट्राची प्रगती मला हवी आहे - राज
दिल्ली रेप प्रकरणातील सगळे आरोपी बिहारी - राज
जमिनी घेणं म्हणजे कोकणचा विकास नव्हे - राज
आपल्या एखाद्या गोष्टीचं मार्केटींग हे जागतिक पातळीवर व्हायला हवं - राज
कोकण पाहावं तिकडे जमीनी परप्रांतीयच विकत घेतायेत - राज
कोकणात हजारो एकर जमीन परप्रांतीय विकत घेतायेत - राज
कोकणात राज्य सरकारने मोठी मदत द्यावी - राज
मी कोणतीही नकार घंटा लावत नाहीये.. मी अगदी पॉझिटिव्ह माणूस आहे - राज
कोकणचा जलद विकास व्हावा - राज
जवळजवळ दोन महिन्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच मीडियासमोर
राज ठाकरे यांची ग्लोबल कोकण महोत्सवाला उपस्थिती