मी बोललो की प्रांतीय, पण बलात्कार करणारे बिहारीच- राज
www.24taas.com, मुंबई
दिल्ली गँगरेप प्रकरणातील आरोपी हे बिहारीच, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतियांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. आज राज ठाकरेंनी पुन्हा परप्रातियांचा मुद्दा घेऊन बिहारींवर निशाणा साधला. राज ठाकरे बोलला की, केसेस टाकायचे अटक करायचे, पण बलात्कार करणारे होते कोण बिहारीच ना? तर कोकणातील हजारो एकर जमिनी परप्रातियांच्या ताब्यात गेल्याचेही त्यांनी सांगितले.
ग्लोबल कोकण महोत्सवाला राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी पुन्हा परप्रांतीय विरोधी सूर आळवला. दिल्ली गॅंगरेप प्रकरणातील आरोपी बिहारीच असल्याचं राज यांनी म्हटलं. कोकणातील जमिनी परप्रांतीयांना विकण्याच्या थांबवल्या तर कोकणचा विकास होईल. बलस्थानं गमावून बसलो तर विकास कसा होईल, असा सवालही त्यांनी केला. ‘मुंबईत उत्तरप्रदेश विद्यापीठ, युपी भवन याची मागणी केली जाते आणि मग मी बोललो की लगेच काय तर प्रांतीय का?’’अशाच जमिनी कृपाशंकर सिंग यांने कोकणात घेऊन ठेवल्या आहेत, ‘कोकणात दिसली जमीन की, घेतली सिंगाने,’
‘त्या मुलीबाबत सहानभुती आहे वाईटपण वाटतं, पण खोलात न जाता फक्त बलात्कार, बलात्कार अशी ओरड होते, पण करणारे होते कोण? राज ठाकरे बोलला की, केसेस टाकायचे अटक करायचे, पण बलात्कार करणारे होते कोण बिहारीच शीला दिक्षीत पण काय म्हणाल्या ही बजबजपुरी माजली का आहे? ह्या परप्रांतियांमुळेच आणि मी याबाबत बोललो की, देश तोडतो मग यावर कोणत्याही पक्षाने बोलायचे नाही, आणि मी बोललो की, लगेच TRP का?’