Last Updated: Tuesday, September 18, 2012, 10:05
सुप्रसिद्ध पंजाबी साहित्यिक दिवंगत अमृता प्रीतम यांचा मुलगा नवराज क्वात्रा यांची काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये हत्या झाली. नवराज क्वात्रा फिल्म फायनान्सर होते. नवराज यांच्या हत्येचं रहस्य अद्याप उलगडलं नसलं, तरी पोलीस तपासणीत क्वात्रांच्या घरात अनेक आक्षेपार्ह गोष्टी आढळल्या आहेत. यामुळे हत्येच्या प्रकरणाला वेगळी दिशा मिळण्याची शक्यता आहे.