इमारत दुर्घटनेचे ६१ बळी, बचावकार्य संपलं

Last Updated: Sunday, September 29, 2013, 08:00

डॉकयार्ड रोड इमारत दुर्घटनाप्रकरणी मृतांचा आकडा ६१ वर गेला असून ४८ तासानंतर मदत आणि बचावकार्य संपलेलं आहे. मात्र ढिगाऱ्याखाली आणखीन काही जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

इमारत दुर्घटना : डेकोटरेटरला तीन दिवसांची पोलीस कोठडी

Last Updated: Saturday, September 28, 2013, 19:20

डॉकयार्ड इमारत दुर्घटनाप्रकरणी पोलिसांनी तळमजल्यावर दुरूस्तीचं काम करणाऱ्या अशोककुमार मेहताला अटक केलीय. मेहताच्या दुकानात दुरूस्तीच्या कामावेळी प्लिंथ किंवा पिलरला धक्का लागल्याची माहिती आहे.

पुणे साखळी स्फोटातील एकाला अटक

Last Updated: Monday, January 14, 2013, 14:53

ऑगस्टमध्ये पुण्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी अणखी एका आरोपीला अहमदनगर जिल्हातल्या श्रीरामपूरमधून अटक करण्यात आलीये. बंटी जहागीरदार असं या आरोपीचं नाव आहे.

पुणे बॉम्बस्फोटातील आणखी एकाला अटक

Last Updated: Friday, October 26, 2012, 22:17

पुणे स्फोटात सहभागी असल्याच्या संशयावरुन हैदराबादमधून इंडियन मुजाहिद्दीनच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

मुंबई हल्ल्यातील आणखी एकाला अटक

Last Updated: Sunday, July 1, 2012, 14:59

सौदी अरबमध्ये आणखी एक दहशतवादी ताब्यात घेण्यात आलाय. मेहमूद फसिह असं या दहशतवाद्याचं नाव आहे. मुंबई हल्ल्यासह भारताताली अनेक बॉम्बस्फोटात फसिहचा मुख्य सहभाग असल्याचा संशय आहे. फसिहला सौदी पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आता त्याला भारतात आणण्यासाठी भारत सरकारतर्फे हालचाली सुरू झाल्यात.